AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘एलॉन मस्कसोबत संबंध संपले, आता गंभीर परिणामांना…’, शाब्दिक युद्धात ट्रम्प यांची धमकी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि टेस्लाचे प्रमुख एलॉन मस्क यांच्यातील वाद संपण्यास तयार नाही. आता ट्रम्प यांनी मस्क यांनी गंभीर परिणामांचा इशारा दिला आहे. ट्रम्प आणि मस्क यांच्यातील वाद बिग ब्यूटीफुल बिलवरुन झाला आहे.

'एलॉन मस्कसोबत संबंध संपले, आता गंभीर परिणामांना...', शाब्दिक युद्धात ट्रम्प यांची धमकी
ट्रम्प आणि मस्क यांच्यात वाद
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jun 08, 2025 | 7:30 AM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि टेस्लाचे प्रमुख एलॉन मस्क यांच्यातील वाद आणखी चिघळला आहे. दोघांकडून शाब्दिक युद्ध अधिक तीव्र होत चालले आहे. शनिवारी मस्क यांनी मवाळ भूमिका स्वीकारली असली तरी आता डोनाल्ड ट्रम्प आक्रमकच आहे. त्यांनी मस्क यांच्यासोबत सर्व संबंध संपले असल्याचे जाहीर करत आता मस्क यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागण्याचा इशाराही दिला आहे.

डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?

एनबीसी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, मला वाटते की आमचे नाते आता संपले आहे. मस्क सोबत संबंध सुधारण्याची माझी कोणतीही इच्छा नाही. एलॉन मस्क यांनी डेमोक्रॅटिक उमेदवारांना विशेषतः रिपब्लिकन पक्षाच्या कर विधेयकाला विरोध करणाऱ्यांना निधी दिला तर गंभीर परिणामांना सामोरे जावे लागणार आहे. मी इतर गोष्टींमध्ये खूप व्यस्त आहे. मी मोठ्या मताधिक्याने निवडणूक जिंकली आहे. त्यानंतर मी सर्वांना खूप संधी दिली. मस्क यांना माझ्या पहिल्या प्रशासनातही संधी दिली. आता त्यांच्याशी बोलण्याचा माझा कोणताही हेतू नाही.

अनुदान संपवण्याची धमकी

ट्रम्प यांनी यापूर्वीच संकेत दिले की, एलॉन मस्क याच्या कंपन्यांसोबतचे सरकारी करार आणि अनुदान संपवण्याचा विचार करू शकतात. पुढे त्यांनी स्पष्ट केले की, त्यांनी अद्याप या संदर्भात कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही. स्टीव्ह बॅनन सारख्या ट्रम्प समर्थकांनी मस्कच्या व्यावसायिक व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. परंतु ट्रम्प यांनी असे म्हटले आहे की, ते सध्या अशा गोष्टीचा विचार करत नाहीत.

ट्रम्प यांनी असा इशाराही दिला की, मस्क २०२६ च्या मध्यावधी निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाला किंवा त्यांच्या उमेदवारांना पाठिंबा देऊ शकतात. त्यांनी असे केले तर त्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. ट्रम्प आणि मस्क यांच्यातील वाद बिग ब्यूटीफुल बिलवरुन झाला आहे. ट्रम्प यांच्या या विधेयकास मस्क यांनी विरोध केला. त्यानंतर मस्क यांनी ट्रम्प प्रशासनातील सल्लागार पदही सोडले.

Follow Us
विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!
Shivsena Case Hearing | विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक
रेवती सुळेंच्या रिसेप्शन सोहळ्यातील सर्वात खास व्हिडीओ!
रेवती सुळेंच्या रिसेप्शन सोहळ्यातील सर्वात खास व्हिडीओ! पंतप्रधान आणि रोहित पवारांच्या संवादादरम्यानच...
जरांगेंनी विशिष्ट समाजाच्या भावना दुखावू नये! अभ्यासपूर्ण बोला
Sachin Kharat | विशिष्ट समाजाच्या भावना दुखावू नका! अभ्यासपूर्ण बोला; सचिन खरातांचा जरांगेंना थेट इशारा
उबाठाचा मोठा डाव! शिवसेना पक्षाच्या 2018च्या घटनेनुसार...
उबाठाचा मोठा डाव! शिवसेना पक्षाच्या 2018च्या घटनेनुसार... ठाकरेंचे वकील थेट निवडणुक आयोगालाच घेरणार?
वसई-विरारमध्ये पावसाचा धुमाकूळ! विवा कॉलेज परिसर जलमय, रस्त्यांना...
Vasai-Virar | वसई-विरारमध्ये पावसाचा धुमाकूळ! विवा कॉलेज परिसर जलमय, रस्त्यांना नदीचं स्वरूप
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच...
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच... एकनाथ शिंदेंनी काय सांगितलं?