जपानमध्ये मांस खाणाऱ्या जीवाणूचा धुमाकूळ, 24 तासात माणसाचा मृत्यू

कोरोना सारख्या महामारीला तोंड दिल्यानंतर जगासमोर आता नवीन एक आव्हान उभं राहतंय. कोरोनाचा व्हायरस चीनमधून जगभरात पसरल्याचं सांगितलं जातं. पण आता जपानमध्ये मांस खाणारा जीवाणू पसरत असल्याचं बोललं जात आहे.

जपानमध्ये मांस खाणाऱ्या जीवाणूचा धुमाकूळ, 24 तासात माणसाचा मृत्यू
Follow us
| Updated on: Jun 15, 2024 | 8:24 PM

जगात कोरोना सारख्या महामारीने धुमाकूळ घातला ज्यामध्ये लाखो लोकांना आपला प्राण गमवावा लागला. कोरोनामुळे अनेकांनी आपली जवळची लोकं गमवली. कुठे कुठे तर संपूर्ण कुटुंब उद्धवस्त झाली. कोरोनाची लस शोधल्यानंतर कोरोनाच्या प्रभाव कमी करण्यात यश आलं. कोरोनाचं संकट कमी होत असतानाच आता पुन्हा एकदा जगाच्या चिंता वाढल्या आहेत. कारण जपानमध्ये एक असा जीवाणू आढळला आहे. जो मांस खातो. स्ट्रेप्टोकोकल टॉक्सिक शॉक सिंड्रोम (STSS) असं या प्राणघातक आणि दुर्मिळ आजाराचं नाव असून तो जपानमध्ये वेगाने पसरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा आजार मांस खाणाऱ्या बॅक्टेरियामुळे होतो आणि त्याचा प्रसार पूर्वीपेक्षा जास्त आहे. देशाची राजधानी टोकियोमध्ये यांचे रुग्ण वाढत आहेत.

48 तासांच्या आत रुग्णाचा मृत्यू

हा आजार अत्यंत धोकादायक बनला असून याचा संसर्ग झाल्यानंतर 48 तासांच्या आत रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. स्थानिक वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, पहिल्या सहामाहीत एकट्या टोकियोमध्ये या आजाराची 145 प्रकरणे नोंदली गेली आहेत. यापैकी बहुतेक प्रकरणे 30 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये आहेत. या रोगाचा मृत्यू दर सुमारे 30 टक्के आहे.

सहा महिन्यांत 900 हून अधिक प्रकरणे

जपानच्या न्यूज एजन्सीच्या अहवालात असे म्हटले आहे की 2 जूनपर्यंत देशात या आजाराची 977 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. मागील वर्षभरात एकूण 941 प्रकरणे नोंदवली गेली होती. पायाच्या जखमा विशेषतः स्ट्रेप्टोकोकल बॅक्टेरियाच्या संसर्गास संवेदनाक्षम असतात आणि फोडासारख्या छोट्या जखमा एंट्री पॉइंट असू शकतात. अहवालानुसार. वृद्ध रुग्णांमध्ये, संसर्गापासून मृत्यूपर्यंत किमान ४८ तास लागू शकतात.

मिळालेल्या माहितीनुसार, या जीवाणूंमुळे अंग दुखणे आणि सूज येणे, ताप, रक्तदाब कमी होणे यासारखी गंभीर आणि वेगाने वाढणारी लक्षणे दिसू शकतात. ही लक्षणे श्वसनाच्या समस्या, अवयव निकामी होणे आणि मृत्यूपर्यंत पोहोचू शकतात. 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना विशेषतः गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे या आजाराने पुन्हा एकदा जगासमोर नवीन आव्हाने येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Non Stop LIVE Update
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले...
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले....
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स.
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात.
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर.
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?.
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती.
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं.
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान.
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.