North Korea : जगात पुन्हा खळबळ, उत्तर कोरियाने डागली मिसाइल्स, दोन देश अलर्टवर
North Korea : किम जोंग उनच्या उत्तर कोरियाने एक अत्यंत आक्रमक कृती केली आहे. त्यामुळे पूर्व आशियात तणाव वाढला आहे. आज सकाळीच इराण-अमेरिकेत मागच्या 38 दिवसांपासून सुरु असलेलं युद्ध थांबलं आहे. युद्धविरामाची घोषणा झाली आहे.

मध्य पूर्वेत सुरु असलेलं इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल युद्ध आता कुठे शांत होतय तोच उत्तर कोरियाने एक अत्यंत आक्रमक कृती केली आहे. इराण-अमेरिका युद्धविरामाच्या घोषणेला काही तास होत नाहीत, तोच उत्तर कोरियाने बॅलेस्टिक मिसाइल्स डागली आहेत. उत्तर कोरियाने त्यांच्या पूर्व किनारपट्टीवरुन अनेक बॅलेस्टिक मिसाइल्स डागली आहेत. त्यामुळे पूर्व आशियात पुन्हा तणाव वाढला आहे. उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र डागताच दक्षिण कोरिया आणि जापान हे दोन देश अलर्ट मोडवर आले आहेत. उत्तर कोरियाने हुकूनशाह किम जोंग उनची सत्ता आहे. उत्तर कोरियाने अनेक शॉर्ट रेंजची बॅलेस्टिक मिसाइल्स समुद्रात डागली आहेत. दोन दिवसातील ही दुसरी मिसाइल चाचणी असल्याचं दक्षिण कोरियाने म्हटलं आहे.
पूर्व किनारपट्टीवरील शहर वोनसॅन येथून ही मिसाइल्स डागण्यात आली. उत्तर कोरियाच्या पूर्व किनारपट्टीवरील समुद्रात कोसळण्याआधी प्रत्येक मिसाइलने 240 किलोमीटरचा टप्पा गाठला अशी माहिती साऊथ कोरियाचे जॉइंट चीफ ऑफ स्टाफने दिली. आमचा जुना सहकारी अमेरिकेसोबत सन्मवय आहे. उत्तर कोरियाच्या कुठल्याही चिथावणीला जशास तस उत्तर देण्यासाठी सक्षम आहोत असं दक्षिण कोरियाच्या लष्कराने म्हटलं आहे.
एका युद्धात आजच सीजफायर
उत्तर कोरियाचं हे पाऊल धक्कादायक यासाठी आहे कारण आजच मध्य पूर्वेत सुरु असलेल्या एका युद्धात सीजफायर झाला आहे. इराण आणि अमेरिकेत सीजफायरची घोषणा झाल्याने जगाने सुटकेचा निश्वास सोडलाय. कारण कमीत कमी आता दोन आठवडे तरी तेल पुरवठा बाधित होणार नाही. कारण स्ट्रेट ऑफ हॉर्मुज सर्वांसाठी ओपन करण्याच्या अटीवर अमेरिका-इस्रायल या सीजफायरसाठी तयार झाले आहेत.
त्यामुळे पुढील अनर्थ टळला
युद्ध सुरु झाल्यापासूनचा आज 38 वा दिवस होता. हे युद्ध थांबत नसल्याने सर्वसामान्यांच्या घरात एलपीजी गॅस, इंधन टंचाई सुरु झालेली. महागाई वाढत होती. त्यामुळे एकाबाजूला युद्ध थांबल्याच समाधान असतानाच आज किंम जोगं उन याने मिसाइल टेस्ट केली. उत्तर कोरियाने मिसाइल डागताच दोन देश लगेच अलर्ट झाले. जपान आणि त्यांचा पारंपारिक शत्रू दक्षिण कोरिया. सुदैवाने हे मिसाइल समुद्रातच पडले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.