AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

US Iran Ceasefire : पाकिस्तान फक्त नावाला, शेवटच्या एक तासात या देशाने फिरवला गेम म्हणून इराण सीजफायरसाठी झाला तयार

US Iran Ceasefire for 2 Weeks : अमेरिका आणि इराणमध्ये अखेर दोन आठवड्यांसाठी युद्धविराम झाला आहे. म्हणजे दोन्ही बाजूंनी परस्परांवर होणारे हल्ले थांबतील. डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेली डेडलाइन संपायला एक तार उरला असताना ही घोषणा झाली.

US Iran Ceasefire : पाकिस्तान फक्त नावाला, शेवटच्या एक तासात या देशाने फिरवला गेम म्हणून इराण सीजफायरसाठी झाला तयार
US-Iran
| Updated on: Apr 08, 2026 | 8:52 AM
Share

US Iran Ceasefire for 2 Weeks : मागच्या अनेक दिवसांपासून जगाचं लक्ष ज्या निर्णयाकडे लागलं होतं, ती घोषणा अखेर आज झाली. सगळ्या जगाने सुटकेचा निश्वास सोडला आहे. मध्य पूर्वेमध्ये आता पुन्हा एकदा शांतता निर्माण होईल अशी आशा निर्माण झाली आहे. अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा झाली आहे. हा युद्धविराम दोन आठवड्यांसाठी आहे. अमेरिकेचे राष्ट्र्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या विनाशाची धमकी दिली होती. त्यांनी दिलेली डेडलाईन संपायला एक तास बाकी असताना युद्धविरामाची घोषणा झाली आहे. दोन्ही बाजूंनी युद्धविरामाची घोषणा झाली आहे. सीजफायर ज्या अटींवर झालय त्यानुसार, इराण आता स्ट्रेट ऑफ हॉर्मुज पूर्णपणे जलवाहतुकीसाठी ओपन करणार आहे. इराणने या जलमार्गावरील वाहतूक नियंत्रित केली होती. मागच्या महिन्याभरापेक्षा जास्त काळ इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल युद्ध सुरु आहे.

अमेरिकेसोबत चर्चेला तयार असल्याचं इराणने म्हटलं आहे. शुक्रवारपासून पाकिस्तानात ही चर्चा सुरु होईल. युद्धविराम कायम रहावा हाच या बैठकीचा उद्देश असेल. या सीजफायर डीलमध्ये पाकिस्तानने मध्यस्थाची भूमिका बजावली असं वरवर दिसतय. पण चीन जर यामध्ये पडला नसता तर ही डील होऊ शकली नसती. न्यूयॉर्क टाइम्सने तीन इराणी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे.

इराणने कोणाचं ऐकलं?

चीनच्या हस्तक्षेपानंतर इराणने शेवटच्या क्षणी पाकिस्तानचा दोन आठवड्यांसाठी युद्धविरामाचा प्रस्तावर स्वीकारला. चीन इराणचा महत्वाचा सहकारी आहे. युद्धकाळात चीनकडून इराणला मदत पोहोचवण्यात आली. इराणने आपली भूमिका लवचिक करावी यासाठी चीनने त्यांची समजूत काढली. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमध्ये ऊर्जा प्रकल्प आणि ब्रिजना लक्ष्य करणार हे आधीच जाहीर केलं होतं.

ही चर्चा म्हणजे युद्ध समाप्ती नाही

इस्लामाबादमध्ये अमेरिका आणि इराणमध्ये चर्चा होईल. इराणच्या सर्वोच्च सुरक्षा परिषदेने युद्धात दोन आठवड्यांचा युद्धविराम मान्य केल्याचं जाहीर केलं. शुक्रवारी 10 एप्रिलपासून इस्लामाबादमध्ये अमेरिकेसोबत चर्चा होईल. ही चर्चा म्हणजे युद्ध समाप्ती नाही असं सुद्धा सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने म्हटलं आहे.

Follow Us
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं काय घडतंय?
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद,
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र.....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे....
मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या व्यवस्था....
Tuljabhavani Temple : मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या धार्मिक व्यवस्थापकावर थेट....