भारताला ज्याची भीती तेच घडले, कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका, पेट्रोल डिझेलचे भाव..

इराण आणि अमेरिका युद्धात कच्च्या तेलाच्या किंमती गगणाला पोहोचल्याचे बघायला मिळाले. सतत तेलाच्या किंमती झपाट्याने वाढत होत्या. त्यातच आता पुन्हा एकदा तेलाच्या किंमतीचा भडका उडाला. 114 डॉलरच्या पुढे किंमती गेल्या आहेत.

भारताला ज्याची भीती तेच घडले, कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका, पेट्रोल डिझेलचे भाव..
crude oil prices
| Updated on: Oct 23, 2026 | 5:49 PM

इराण आणि अमेरिका युद्ध पेटले आहे. पुन्हा होर्मुज खाडीत भडका उडाला. एकाच वेळी 4 तेलवाहू जहाजांवर हल्ला करण्यात आला. इराण आणि अमेरिका युद्ध थांबण्याचे संकेत असतानाच पुन्हा होर्मुज खाडी भडका उडाला. होर्मुज खाडी आपल्या नियंत्रणात घेण्यासाठी मोठे प्रयत्न अमेरिकेने केले पण त्यांना अपयश मिळाले. होर्मुज खाडी सुरक्षित असल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून केला जात आहे. पण होर्मुज खाडीत मोठे तांडव बघायला मिळातंय. त्यातच भारताला ज्याची भीती तेच घडताना दिसत आहे. होर्मुज खाडीत उडालेला भडका यामुळे कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ झाली. प्रति बॅरल किंमत थेट 114 डॉलरच्या पार गेली. ज्यामुळे देशात लवकरच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ होऊ शकते. जागतिक बाजारातील अशांतता यामुळे भारतीय तेल कंपन्यांवरील दबाव प्रचंड वाढला आहे.

पुढील दोन दिवसात कच्च्या तेलाच्या किंंमतीमध्ये अजून वाढ होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी वाढ होतंय. ब्रेंट क्रूडचा दर प्रति बॅरल 114 डॉलरच्या पुढे पोहोचला. पश्चिम आशियातील वाढता संघर्ष, सौदी अरेबियातील तेल पायाभूत सुविधांवरील हल्ले आणि यासोबतच जागतिक तेलपुरवठा विस्कळीत होण्याच्या भीतीमुळे दरात वाढ झाली आहे.

Loading...

या दरवाढीचा भारताच्या इंधन आयातीचा खर्च आणि महागाईवर दबाव येण्याची शक्यता आहे. हुथी इराणी समर्थकांकडून सौदी अरेबियाच्या तेल पायाभूत सुविधांवर हल्ले केले जात आहेत. ज्यामुळे तेल प्रकल्पांचे मोठे नुकसान होत आहे. तेल प्रकल्प आणि विमानतळांवर हल्ले होत आहेत.

मागील काही दिवसांत हे हल्ले थांबले होते. होर्मुज खाडीतून जहाजांची ये-जा सुरू होती. जागतिक बाजारपेठ स्थिरावली होती. पण पुन्हा एकदा तणाव वाढला. या वाढलेल्या तणावाचा परिणाम जागतिक बाजारापेठेवर बघायला मिळत आहे. होर्मुज खाडीत भारतीय जहाजांवरही मोठे हल्ले झाले. होर्मुज खाडी हा जगातील तेल वाहतुकीसाठी सर्वात महत्वाच्या असलेल्या मार्गांपैकी एक आहे. भारतात जवळपास याच मार्गे कच्चे तेल दाखल होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us