अमेरिकेची खैर नाही! डोनाल्ड ट्रम्प यांना भारताचा पहिला सर्वात मोठा झटका, थेट विरोधात भूमिका, 11 देश मैदानात..

डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात अनेक देश मैदानात उतरली असून भारतासोबत पंगा घेणे त्यांना चांगलेच महागात पडल्याचे बघायला मिळतंय. भारतासह 11 देशांनी अमेरिकेच्या विरोधात थेट भूमिका घेतली आहे. अफगाणिस्तानचे सर्वांनी समर्थन केले.

अमेरिकेची खैर नाही! डोनाल्ड ट्रम्प यांना भारताचा पहिला सर्वात मोठा झटका, थेट विरोधात भूमिका, 11 देश मैदानात..
Afghanistan Bagram Air Base
| Updated on: Oct 08, 2025 | 10:07 AM

डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा दावा करत म्हटले होते की, अफगाणिस्तानातील बग्राम हवाई तळ पुन्हा अमेरिकेच्या ताब्यात दिले पाहिजे. कारण ते हवाई तळ अमेरिकेने तयार केले आहे. बायडेन यांची सर्वात मोठी ती चूक होती अमेरिकी सैन्याचा ताबा तिथून काढण्याची. परत एकदा अमेरिकी सरकार बग्राम हवाई तळावर ताबा मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, अमेरिकी लष्कराचा बग्राम हवाई तळावरील ताब्याला अफगाणिस्तानने विरोध केला. अफगाणिस्तानसाठी अनेक देश मैदानात आली असून त्यांनी थेट अमेरिकेच्या विरोधात भूमिका घेतली. यामध्ये भारत देखील आहे. अमेरिकेचे अफगाण धोरण पुन्हा एकदा जागतिक वादात सापडले आहे. अमेरिकेच्या विरोधात प्रमुख आशियाई शक्ती एकत्र आल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प अफगाणिस्तानवर बग्राम हवाई तळ पुन्हा देण्यासाठी दबाव टाकत आहेत. भारत, रशिया, चीन, इराण आणि इतर सात देशांनी मिळून स्पष्ट म्हटले की, अफगाणिस्तानात कोणत्याही परदेशी लष्करी पायाभूत सुविधा तैनात करण्यास विरोध आहे. ‘मॉस्को फॉरमॅट’ बैठकीत या देशांनी अफगाणिस्तानातील शांतता, स्थिरता आणि विकास यावर चर्चा केली. भारताच्या वतीने राजदूत विनय कुमार यांनी बैठकीत भाग घेतला.

विनय कुमार यांनी या बैठकीत बोलताना म्हटले की, भारत स्वतंत्र, शांत आणि स्थिर अफगाणिस्तानला पाठिंबा देतो. एक सुरक्षित आणि स्थिर अफगाणिस्तान केवळ अफगाणिस्तानच्या लोकांसाठीच नाही तर संपूर्ण प्रदेशाच्या स्थिरतेसाठी आणि जागतिक सुरक्षेसाठी नक्कीच आवश्यक आहे. संयुक्त राष्ट्रांच्या संस्थांनी देखील कबूल केले आहे की, अफगाणिस्तानातील ड्रग्ज पिकवणाऱ्या क्षेत्रांमध्ये लक्षणीय घट झाली आहे.

भारत, रशिया, चीन, इराण आणि इतर सात देशांनी मिळून अमेरिकेविरोधात भूमिका घेतली असून अफगाणिस्तानला पाठिंबा दिला आहे. सध्या बग्राम हवाई तळावर अफगाणिस्तानचे नियंत्रण आहे. भारत, चीन आणि रशियाने अफगाणिस्तानला आर्थिक मजबूत करण्यावरही भाष्य केले. कोणत्याही परिस्थितीमध्ये बग्राम हवाई तळ अमेरिकेच्या ताब्यात जाऊ नये, अशी सर्वांची भूमिका आहे. हा अमेरिकेला नक्कीच मोठा धक्का म्हणाला लागेल.