AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वत:च्या पायावर मारला दगड! डोनाल्ड ट्रम्प यांच्या नादी लागून या देशाने घेतला भारतासोबत मोठा पंगा, पाकिस्तानचे नाव घेत थेट…

डोनाल्ड ट्रम्प भारताला अडकवण्यासाठी सतत प्रयत्न करत आहेत. भारतावर 50 टक्के टॅरिफ लावूनही डोनाल्ड ट्रम्प यांचे पोट भरले नाही. H-1B व्हिसाच्या नियमात त्यांनी मोठा बदल केला आहे. भारत आणि पाकिस्तान युद्धाबाबतही ते मोठा दावा करताना दिसत आहेत.

स्वत:च्या पायावर मारला दगड! डोनाल्ड ट्रम्प यांच्या नादी लागून या देशाने घेतला भारतासोबत मोठा पंगा, पाकिस्तानचे नाव घेत थेट...
Mark Carney and Donald Trump
| Updated on: Oct 08, 2025 | 9:02 AM
Share

डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B व्हिसासोबतच टॅरिफबद्दल घेतलेल्या धक्कादायक निर्णयानंतर भारत-अमेरिकेतील संबंध अधिकच ताणले आहेत. त्यामध्येच मागील काही दिवसांपासून भारताचे कॅनडासोबतचे संबंधही तणावात आहेत. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी मंगळवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे काैतुक केले. हेच नाही तर डोनाल्ड ट्रम्प त्यांचे आवडते अध्यक्ष असल्याचेही त्यांनी म्हटले. भारताला धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांच्या खोट्या दाव्याला मार्क कार्नी यांनी खरे असल्याचे म्हटले. भारत-पाकिस्तान यांच्यातील युद्धाबंदीवरही त्यांनी मोठे विधान केले. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी हे डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर काैतुकांचा वर्षाव करताना दिसले.

डोनाल्ड ट्रम्प यांचे कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी केले काैतुक 

कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना बोलताना म्हटले की, तुम्ही एक परिवर्तनकारी राष्ट्रपती आहात. अर्थव्यवस्थेत परिवर्तन घडवून आणणे आहे. नाटो भागीदारांना संरक्षण खर्चासाठी वचनबद्ध केले आणि भारत आणि पाकिस्तानपासून अझरबैजान आणि आर्मेनियापर्यंत शांतता प्रस्थापित केली. दहशतवादाची शक्ती म्हणून इराणवर अनेक प्रतिबद्ध लादले. यामुळे तुमचे काैतुक करण्याइतके कमी असल्याचे त्यांनी म्हटले.

भारत-पाकिस्तान युद्धाबाबत केला दावा 

मार्क कार्नी यांनी भारत-पाकिस्तान युद्धाचा देखील यावेळी उल्लेख केला. ज्याने त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनीच भारत-पाकिस्तान युद्ध रोखल्याचे थेट म्हटले. भारताने याअगोदर 100 वेळा स्पष्ट म्हटले आहे की, भारत-पाकिस्तान युद्धात व्दिपक्षीय मुद्द्यांवर चर्चा झाली आणि त्यानंतर युद्धबंदीचा निर्णय झाला. अमेरिकाच नाही तर दुसऱ्या कोणत्यााही देशांनी यामध्ये हस्तक्षेप घेतला नाहीये. मात्र, डोनाल्ड ट्रम्प सतत हे युद्ध रोखल्याचा दावा करताना दिसत आहेत.

भारत-अमेरिकेतील संबंधात अधिक तणाव 

कॅनडा आणि भारताचे संबंध गेल्या काही वर्षांपासून चांगले राहिले आहेत. मात्र, आता कॅनडासोबतचे संबंध तणावात आहेत. त्यामध्येच आता कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी भारत-पाकिस्तान युद्धाबाबत मोठा दावा केला. H-1B व्हिसाच्या नियमात अमेरिकेने बदल केल्यानंतर कॅनडाने भारतीय नागरिकांचे कॅनडात आम्ही स्वागत करू आणि चांगले नोकरदार यांना आमच्या देशात संधी देऊ असे त्यांनी स्पष्टपणे म्हटले होते.

दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.