Jaishankar Azerbaijan Visit : बांग्लादेश आणि आपल्या मैत्रीत फूट पाडणाऱ्या पाकिस्तानसोबत आता भारतानेही तेच केलं, त्यांचा जवळचा मित्र फोडला
Jaishankar Azerbaijan Visit : बांग्लादेश तीन-चार वर्षांपूर्वी भारताचा सच्चा मित्र होता. पण आता ती परिस्थिती राहिलेली नाही. आंतरराष्ट्रीय बदलत चाललय. बांग्लादेशला भारतापासून दूर करण्यात पाकिस्तानची महत्वाची खेळी आहे. आता भारताने पाकिस्तानला सुद्धा तशाच भाषेत प्रत्युत्तर दिलं आहे.

भारत आणि बांग्लादेशमध्ये चांगली मैत्री होती. पण आता या नात्यात अविश्वास निर्माण झालाय. याला कारण आहे पाकिस्तान. त्यांच्याकडून बांग्लादेशला आपल्या जवळ ओढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. बांग्लादेशचा विश्वास संपादन करुन त्यांना भारतापासून दूर करायचं ही पाकिस्तानची रणनिती आहे. आता भारतानेही पाकिस्तानला जशास तसं उत्तर दिलं आहे. अजरबैजान हा पाकिस्तानचा जवळचा मित्र आहे. आता भारताने त्यांच्यासोबत संबंध सुधारायला सुरुवात केली आहे. ऑपरेशन सिंदूरच्यावेळी हा अजरबैजान पाकिस्तानच्या बाजूने होता. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी शुक्रवारी अजरबैजानच्या राजधानीत बाकूमध्ये राष्ट्रपती इल्हाम अलीयेव आणि परराष्ट्र मंत्री जेयहुन बायरामोव यांची भेट घेतली. या दरम्यान दोन्ही देशांमध्ये व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा आणि संपर्क सुविधा वाढवण्यावर चर्चा झाली. मागच्या काही वर्षात दोन्ही देशांच्या संबंधात तणाव होता. आता द्विपक्षीय संबंधांना नवीव दिशा देण्याचा प्रयत्न सुरु आहे.
जयशंकर यांचा हा दौरा म्हणजे मागच्या आठ वर्षातील कुठल्या भारतीय परराष्ट्र मंत्र्याचा हा पहिला दौरा आहे. दोन्ही देशांच्या संबंधात सुधारणेचे संकेत मिळत असताना हा दौरा होतोय. पाकिस्तान आणि तुर्की सोबत अजरबैजानचे खूप जवळचे संबंध आहेत, त्याचा परिणाम भारत-अजरबैजान संबंधांवरही झाला. मे 2025 मध्ये दोन्ही देशांमध्ये चार दिवस सैन्य संघर्ष झाला. त्यावेळी अजरबैजानच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारताने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याचा निषेध केला होता. त्यामुळे भारत नाराज झालेला.
सकारात्मक भूमिकेचं कौतुक
जयशंकर राष्ट्रपती अलीयेव यांना भेटले. त्यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वतीने त्यांनी शुभेच्छा दिल्या. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंध बळकट करण्यावर चर्चा केली. जयशंकर यांनी सोशल मीडियावर अलीयेव यांच्या सकारात्मक भूमिकेचं कौतुक केलं. अजरबैजानचे परराष्ट्र मंत्री बायरामोव यांच्यासोबत उपयुक्त चर्चा झाल्याचं जयशंकर यांनी सांगितलं. या चर्चेमुळे दोन्ही देशांच्या संबंधातील प्रगतीचा मार्ग मोकळा झाला. दोन्ही बाजू अनेक क्षेत्रात परस्परांना सहकार्य करण्यावर सहमत झाले.
चार वर्षानंतर द्विपक्षीय चर्चा
परस्परांचं हित असलेल्या क्षेत्रात नवीन संधी शोधणं आणि संवाद कायम ठेवणं यावर भर दिल्याचं बायरामोव यांनी सांगितलं. सप्टेंबर महिन्यात किर्गिस्तान मध्ये शंघाई सहकार्य संघटना शिखर सम्मेलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अजरबैजनाचे राष्ट्रपती अलीयेव यांची भेट झाली होती. त्यानंतर जयशंकर आणि बायरामोव भेटले. एप्रिलमध्ये जवळपास चार वर्षानंतर दोन्ही देशांच्या परराष्ट्र कार्यालयांमध्ये द्विपक्षीय चर्चा झालेली. दोन्ही देशांचे संबंध पुन्हा रुळावर आणणं हा जयशंकर यांच्या अजरबैजान दौऱ्यामागचा उद्देश आहे.