
PM Narendra Modi: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल विश्वात मोठा विक्रम रचला आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेशातील दिग्गज व्यक्तींना देखील मागे टाकलं आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युट्यूबवर एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींच्या युट्यूब चॅनेलने 3 कोटी म्हणजे 30 मिलियनपेक्षा अधिक सबस्क्राइबर गाठले आहेत. सर्वात महत्त्वाचं सांगायचं झालं तर, पंतप्रधान मोदी हे YouTube वर सर्वाधिक फॉलोअर्स असलेले जागतिक नेते आहेत. त्यांच्याबद्दल लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट म्हणजे, पंतप्रधान मोदी सध्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जगातील सर्वाधिक फॉलोअर्स असलेले नेते आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या युट्यूब चॅनेलवरील सब्सक्रायबर्सची संख्या अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा 7 पटीने अधिक आहे… समोर आलेल्या आकड्यांवरून दिसून येत आहे की, पंतप्रधान मोदींची डिजिटल पोहोच आणि जागतिक स्तरावरील सहभाग किती व्यापक आहे. या शर्यतीत दुसरा कोणताच नेता पंतप्रधान नरेंद्र यांच्या जवळपास देखील पोहोचत नाही.
भारतात देखील या बाबतीत पंतप्रधान मोदींच्या जवळपास दुसरा कोणताच नेता नाही. सबस्क्राइबर्सच्या बाबतीत, पंतप्रधान मोदींचे सबस्क्राइबर्स राहुल गांधींच्या जवळपास तिप्पट आहेत. तर आम आदमी पार्टी आणि काँग्रेसच्या सबस्क्राइबर्सच्या पटीने चौपट आहेत. ही संख्या फार मोठी आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी युट्यूबवर सर्वात जास्त सब्सक्रायबर्स असणारे नेते आहेत. पण 30 कोटी सबस्क्राइबर्सपर्यंत पोहोचल्याने जागतिक नेते म्हणून त्यांचं स्थान आणखी मजबूत झालं आहे. एवढंच नाही तर, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी YouTube वर एक जागतिक बेंचमार्क स्थापित केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर या यादीमध्ये कोण आहे? असा प्रश्न देखील तुम्हाला पडला असेल… क्रमांकाबद्दल सांगायचं झालं तर, दुसऱ्या क्रमांकावर ब्राझीलचे माजी राष्ट्रपती जैर बोल्सोनारो आहेत. युट्यूबवर त्यांचं जवळजवळ 6.6 मिलियन सब्सक्रायबर्स आहेत. तर या यादीमध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प चौथ्या क्रमांकावर आहेत. त्यांचे युट्यूबवर 4 मिलियन सब्सक्रायबर्स आहेत.