भारताला दणका, अमेरिकेकडून विश्वासघात होण्याची शक्यता, थेट बैठकच…

डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून टॅरिफबद्दल सातत्याने धक्कादायक अशी निर्णय घेतली जात आहेत. कोर्टाने फटकारल्यानंतरही डोनाल्ड ट्रम्प सुधारले नाहीत. उलट त्यांनी संपूर्ण जगाला संकटात टाकल्याचे बघायला मिळत आहे, त्यांनी धक्कादायक निर्णय घेतला.

भारताला दणका, अमेरिकेकडून विश्वासघात होण्याची शक्यता, थेट बैठकच...
India and America Trade Agreement
| Updated on: Feb 22, 2026 | 2:57 PM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मागील काही दिवसांपासून धक्कादायक निर्णय घेत आहेत. जर एखाद्या देशाने त्यांचे म्हणणे ऐकले नाही तर भरमसाठ टॅरिफ आकारत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेच्या कोर्टाने फटकारे असून डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफ बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट शब्दात कोर्टाने म्हटले. मात्र. कोर्टाच्या निर्णयानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा अधिक थयथयाट झाल्याचे बघायला मिळतंय. त्यांनी सर्वच देशांवर 15 टक्के अतिरिक्त टॅरिफ लावण्याचा धक्कादायक निर्णय घेतला. सुरूवातीला त्यांनी 10 टक्के टॅरिफ लावणार असल्याचे म्हटले. मात्र, त्यानंतर त्यांनी अतिरिक्त 15 टक्के टॅरिफचा थेट अध्यादेश काढला. भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याचे कारण देत डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरूवातीला भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला. भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने भारतावर मोठा टॅरिफ लावला आणि त्यानंतर तो काढत 18 टक्के टॅरिफची घोषणा केली.

भारत आणि अमेरिकेत व्यापार करार झाले असून सध्या तांत्रिक बाबींवर काम सुरू आहे. या करारामध्येच ठरले की, भारतावर 18 टक्के टॅरिफ असणार. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी अतिरिक्त 15 टक्के टॅरिफ सर्वच देशांना लावण्याची घोषणा केली. पण हा अतिरिक्त टॅरिफ भारतावर लागणार नसल्याचे सांगितले जात आहे. यादरम्यानच अमेरिकेकडून असा काही निर्णय घेण्यात आला की, मोठी खळबळ उडाली.

अमेरिकेने 15 टक्के अतिरिक्त टॅरिफबद्दल घोषणा केली. मात्र, यादरम्यानच पुढील आठवड्यात होणाऱ्या व्यापार करार चर्चा बैठक पुढे ढकलण्याचा निर्णय अमेरिकेकडून घेतला जाऊ शकतो. तशी शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात आली आहे की, व्यापार कराराबाबत पुढील आठवड्यातील बैठक अमेरिकेने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. काही बाबींवर अजून स्पष्टीकरण झाले नसल्याचे अमेरिकेकडून सांगितले जात आहे.

भारताने अमेरिकेसोबत व्यापार करार फायनल करण्याअगोदरच टॅरिफ कमी करण्याची मुख्य अट ठेवली होती. त्यानुसार, अमेरिकेने भारतावरील टॅरिफ कमी केला. भारताने व्यापार करारासाठी टॅरिफ कमी होत असल्याने होकार दिला. मात्र, काही दिवसातच भारतावर जर अतिरिक्त अजून 15 टक्के टॅरिफ लावला तर हा मोठा धक्काच असणार आहे.

Follow Us