भारत रशियाची साथ सोडणार नाही, थेट अमेरिकेत खळबळ, रशियाकडून निर्बंधांनंतरही..
इराण आणि अमेरिका युद्धात जग संकटात आहे. जागतिक बाजारपेठ युद्धामुळे अस्थिर झाली. जागतिक बाजारात तेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ होत आहे. यादरम्यानच आता भारताने तेल खरेदीबाबत आपली भूमिका स्पष्ट ठेवली आहे.

इराण आणि अमेरिका युद्धात अमेरिकेने मोठी घोषणा करत रशिया आणि इराण यांच्या तेलावरील निर्बंध एक महिन्याकरिता हटवले. जागतिक बाजारात तेलाच्या किमती स्थिर ठेवण्याकरिता त्यांनी निर्णय घेतला. युद्धाला सुरूवात झाल्यानंतर जागतिक बाजारात तेलाच्या किमती गगणाला पोहोचल्या. अमेरिकेने हे निर्बंध फक्त एक महिन्याकरिताच हटवले होते. आता याला एक महिना पूर्ण झाला. पुन्हा एकदा रशियाच्या कच्च्या तेलावर अमेरिकेने निर्बंध घातली. भारतात कच्च्या तेलाची आणि एलपीजी गॅसची मोठी मागणी आहे. रशियाच्या तेलावर लादण्यात आलेल्या निर्बंधांनंतर भारत नक्की कोणाकडून तेल खरेदी करणार हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. भारताने कोणाकडून तेल खरेदी करावी, हे सांगण्याचा अधिकार जगातील कोणत्याही देशाला नाही. भारताने आपली भूमिका स्पष्ट ठेवली आहे. निर्बंधांनंतरही भारत हा रशियाकडूनच तेल खरेदी करणार आहे.
अमेरिकेने न जुमानता भारत रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवणार असल्याची माहिती मिळत आहे. इराण आणि अमेरिकेच्या युद्धात कच्च्या तेलाचे मोठे संकट आहे. अनेक तेल प्रकल्पांवर हल्ले झाले. होर्मुज खाडी बंद आहे. होर्मुज खाडी बंद असल्याने तेलाची आयात आणि निर्यात मर्यादित झाली. भारतात एलपीजी गॅसचा तुटवडा आहे. पण कच्चा तेलाचा नाही.
जग तेलाच्या समस्येला झुंज देत असताना भारताच्या मदतीला रशिया धावून आला. रशियाने मोठ्या प्रमाणात भारतात तेल पुरवठा केला. एका मागून एक रशियाचे तेल जहाज भारतात दाखल होताना दिसले. आता अमेरिकेने लादलेल्या निर्बंधांनंतरही भारत रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवणार असल्याचे स्पष्ट आहे.
अमेरिकेने रशियाच्या तेलावरील निर्बंध पुन्हा लादले आहेत. मात्र, युद्ध अजून संपले नाही. युद्धविराम झाला नसल्याने जगात कच्च्या तेलाच्या किमती वाढत आहेत. अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेन्ट यांनी बुधवारी सांगितले की, रशियन तेलावरील ही सूट वाढवली जाणार नाही. अमेरिकेने इराणी तेलाबाबतही असाच निर्णय घेतला आहे. रशियाचे अध्यक्ष पुतिन लवकरच भारत दाैऱ्यावर येणार आहेत.