Israel-Iran War : इराणचं सणसणीत प्रत्युत्तर, अमेरिकेला पहिला झटका, त्याशिवाय लाखो भारतीयांचा जीव धोक्यात

Israel-Iran War : आज सकाळपासून मध्य पूर्वेत एका भयानक युद्धाला सुरुवात झाली आहे. अमेरिका-इस्रायलने मिळून इराणवर भीषण हल्ला चढवला. इराणने केलेल्या प्रत्युत्तराच्या कारवाईत अमेरिकेला सुद्धा मोठा धक्का बसला आहे.

Israel-Iran War : इराणचं सणसणीत प्रत्युत्तर, अमेरिकेला पहिला झटका, त्याशिवाय लाखो भारतीयांचा जीव धोक्यात
US vs Iran
| Updated on: Feb 28, 2026 | 3:49 PM

ऑपरेशन फतह-ए-खैबर अंतर्गत इराणने एकाचवेळी 7 देशांवर हल्ला केलाय. ज्या देशांवर इराणने हल्ला केलाय, त्यात इस्रायल, यूएई, सौदी अरेबिया, कुवैत, जॉर्डन, कतर आणि बहरीन हे देश आहेत. इस्रायल वगळता बाकी सर्व देशात इराणने अमेरिकी तळांवर हल्ला केलाय. इराणने आधीच अमेरिकेला विनाशकारी प्रत्युत्तर देण्याची घोषणा केली होती. इराणच्या प्रत्युत्तराच्या कारवाईने सर्वात जास्त नुकसान अमेरिकेचं झालं आहे. कारण एकाचवेळी 6 ठिकाणांवर इराणने मिसाईल हल्ला केलाय.

बहरीनमधून जे फोटो समोर आलेत, त्यामध्ये अमेरिकन नौदल दल तळ इराणच्या हल्ल्यात पूर्णपणे उद्धवस्त झालाय. कतरमधील बेसवर हल्ल्याच्यावेळी अमेरिकेने आपल्या सर्व नागरिकांना बंकरमध्ये लपण्यास सांगितलं आहे. आमच्यावर हल्ला झाल्यास आम्ही अशा प्रकारची कारवाई करु असं इराणने आधीच सांगितलं होतं. त्यानुसार त्यांनी आसपासच्या देशांवर हल्ले केले आहेत. म्हणून आखाती देश हे युद्ध थांबवण्याचा प्रयत्न करत होते. इस्रायल-अमेरिकेने मिळून इराण विरुद्ध सुरु केलेल्या या युद्धात लाखो भारतीयांचा जीवही धोक्यात आला आहे. कारण इराणने आखातामधील ज्या देशांवर हल्ला केलाय, तिथे भारतीय नागरिक मोठ्या संख्येने राहतात. नोकरी, काम-धंद्याच्या निमित्ताने हे भारतीय नागरिक तिथे गेले आहेत.

इराणने आधी तेल-अवीववर हल्ला केला. इस्रायलची राजधानी तेल अवीववर इराणने मिसाइल्सचा पाऊस पाडला.

इराणने बहरीनमधील अमेरिकन नौदल तळाला लक्ष्य केलं. इथे अमेरिकेची F-12 विमानं तैनात होती. इराणने हे बेस उद्धवस्त केलाय.

इराणने त्यानंतर अबू धाबी येथील अमेरिकी बेसला लक्ष्य केलं. अबू धाबीवरील हल्ल्यामुळे UAE मध्ये अलर्ट घोषित केलाय.

कतरच्या संरक्षण मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इराणने दोहा येथील अमेरिकी बेसला टार्गेट केलं. तिथे मिसाईल हल्ला केला.

इराणने सौदी अरेबियाच्या रियादवर हल्ला केला. तिथल्या अमेरिकी बेसवर मिसाइल हल्ला झालाय.

इराणने जॉर्डनमधील अमेरिकी मुख्यालयावर हल्ला केला. जॉर्डन इस्रायलचा शेजारी देश आहे. जॉर्डनजवळ अमेरिकेची F-22 फायटर जेट्स तैनात आहेत.

इराणने कुवेत मध्येही हल्ला केलाय. तिथेही अमेरिकी बेस आहे. इराणने म्हटलय की, युद्ध सुरु राहिलं तर सगळ्या मिडिल ईस्टमध्ये अशीच स्थिती राहिलं.

Follow Us