AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Israel Iran War : इस्राईल आणि अमेरिकेने इराणवर भरदिवसा का केला हल्ला, काय होता प्लान ?

Israel Iran War: इस्राईल आणि अमेरिका खूप काळ इराणवर हल्ला करण्याची तयारी करीत होती. अखेर, शनिवारी इराणवर अनेक शहरांवर मिसाईल हल्ले केले आहे. यावेळी अमेरिका आणि इस्राईलने हल्ल्यासाठी दिवसाची वेळ का निवडली असा प्रश्न केला जात आहे.

Israel Iran War : इस्राईल आणि अमेरिकेने इराणवर भरदिवसा का केला हल्ला, काय होता प्लान ?
Israel Iran War
| Updated on: Mar 01, 2026 | 11:52 AM
Share

वॉशिंग्टन – इस्राईलने अखेर इराणवर हल्लाबोल केला आहे. अमेरिकेने इस्राईललाच इराणवर हल्ला करण्यास प्रवृत्त केले आहे. इराणची राजधानी तेहराणसह कोम, खोर्रामाबाद आणि इस्फहान सह अनेक शहरांवर इस्राईलने हल्ला केला आहे. इस्राईलच्या क्षेपणास्र हल्ल्यानंतर इराणच्या शहरांवर धुराचे ढग जमा झालेले दिसत आहेत. एखादा देश सर्वसाधारणपणे दुसऱ्या देशांवर हल्ला करताना रात्रीचे मिसाईल हल्ले करतो, म्हणजे जास्त नुकसान व्हावे अशी रणनिती असते. मात्र, भरदिवसा हल्ल्या करण्यामागे इस्राईल आणि अमेरिकेची रणनिती काय आहे असा सवाल केला जात आहे.

इस्राईल-US चे संयुक्त ऑपरेशन

इस्राईल टाईम्सच्या अज्ञात सुरक्षा सूत्रांनी सांगितले की इराणवरील हल्ल्याची योजना काही महिन्यांआधी अमेरिकेसोबत मिळून इस्राईलने रचली होती. या ऑपरेशनमध्ये इस्राईलने संपूर्ण ताकद लावली आहे आणि अमेरिका देखील त्यांच्या सोबत आहे. सूत्रांनी सांगितले की या संयुक्त कारवाईचा हा सुरुवातीचा टप्पा आहे. जो चार दिवस चालवण्याची योजना आहे.

भरदिवसा का केला हल्ला ?

आतापर्यंत मध्य पूर्वेतील हल्ले हे रात्रीचे केले जात होते. टीव्हीतील बातम्यानुसार सकाळच्या उजेडात हल्ल्याला सुरुवात करण्यामागे इराणी लोकांना चकवणे हा हेतू होता. कारण दिवसाच्या हल्ल्याची कल्पना इराणने देखील केली नव्हती. त्यांना वाटले नव्हते की दिवसाच्या उजेडात हल्ले केले जातील. यामुळे इराण हा या हल्ल्यांना पुरेसा तप्तर नव्हता आणि त्यामुळे त्याचे जास्त नुकसान करण्याची खेळी यामागे होती. मात्र, अद्यापपर्यंत तरी इराणचे नेमके किती नुकसान झाले आहे याची अधिकृतपणे बाहेर आकडेवारी आलेली नाही.परंतू असे म्हटले जात आहे की इस्राईलने विचारपूर्वक अत्यंत रणनितीपूर्वक हे हल्ले केलेले आहेत.

काय म्हणाले ट्रम्प ?

इस्राईलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रीया दिली आहे. ट्रम्प म्हणाले की इराणसोबत अलिकडे झालेल्या बैठकांमुळे आपण खूष नाही. इराणकडे आण्विक शस्रास्रे नकोत आणि त्यांच्याजवळ युरेनियम संवर्धनाची क्षमता असायला नको अशी आमची भूमिका आहे. इस्राईलने त्यांच्या देशाला वाचवण्यासाठी पावले उचलली आहेत असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.

इराणची मोबाईल सेवा ठप्प

इस्राईलच्या हल्ल्यानंतर इराणमधील मोबाईल नेटवर्क बंद पडले आहे. अनेक सरकारी वेबसाईट हॅक झाल्या आहेत. इस्राईलच्या सैन्याने सांगितले की इराणवरील हे हल्ले अनेक दिवस सुरु राहू शकतील. या युद्धाची तयारी अनेक दिवसांपासून सुरु होती. ट्रम्प यांनी दावा केला आहे की अमेरिकेने इराणविरोधात मोठी लढावू मोहिम सुरु केलेली आहे, इराणने त्याच्या आण्विक कार्यक्रमाला विकसित करणे सुरुच ठेवले असून त्याची योजना अमेरिकेपर्यंत पोहचणारी क्षेपणास्रे तयार करणे हे आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...