AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिका-इराणमध्ये युद्धाचे ढग, अमेरिका आणि चीनचे त्यांच्या नागरिकांना बाहेर पडण्याचे आदेश

अमेरिकेने आणि चीनने त्यांच्या नागरिकांना इस्राईल आणि वेस्ट बँक परिसरात प्रवास न करण्याचे आदेश दिले आहेत. इराणमध्ये जाऊ नये. जे आधीच तेथे आहेत त्यांना तातडीने इराण सोडावे असेही आदेश देण्यात आले आहेत.

अमेरिका-इराणमध्ये युद्धाचे ढग, अमेरिका आणि चीनचे त्यांच्या नागरिकांना बाहेर पडण्याचे आदेश
Trump and Khamenei
| Updated on: Feb 27, 2026 | 8:37 PM
Share

मध्य पूर्वेत तणाव वाढत चालला असून अमेरिका आणि इराणचे युद्ध जाहीर होण्याची शक्यता वाढली आहे. अमेरिकेने इस्राईलमध्ये तैनात आपल्या अनावश्यक सरकारी कर्माचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना तेथून निघण्याचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे इस्राईलमधील अमेरिकन राजदूत माईक हकाबी यांनी दुतावासातील कर्मचाऱ्यांना ईमेल पाठवून जे लोक इस्राईल सोडू इच्छीत आहेत, त्यांना आज तेथून निघण्याचे आदेश दिले आहेत. हकाबीने पाठवलेल्या इमेलमध्ये म्हटले आहे की विमानांच्या तिकीटांची मागणी वाढू शकते. यासाठी लागलीच विमानांची तिकीटे बुक करुन आधी देशातून बाहेर पडावे. नागरिकांनी घाबरु नये. परंतू जे जाऊ इच्छीत आहेत त्यांनी उशीर करु नये असेही म्हटले आहे.

इराणच्या एका मोठ्या धर्मगुरुंनी सांगितले की जर अमेरिकेसोबत सुरु असलेली बोलणी जर फिस्कटली तर युद्ध देखील होऊ शकते. फार्स प्रांतातील सुप्रीम लीडर आयातुल्ला अली खामेनेई यांचे प्रतिनिधी लुत्फोल्लाह देझकाम यांनी सांगितले की बैठकीतील निकाल चांगला आला नाही किंवा बोलणी निष्फळ ठरली तर पुढचा रस्ता युद्धाचा देखील असू शकतो. ते म्हणाले की इराण मजबूत स्थितीत बोलणी करत आहे. युद्धाचे गंभीर परिणाम होतील हे दुसऱ्या बाजूला समजले तरच बोलणी फायदेशीर ठरतील असेही ते म्हणाले.

US स्टेट डिपार्टमेंटने ट्रॅव्हल एडव्हायझरी अपडेट केली आहे. सुरक्षेच्या कारणाने नॉन-इमर्जन्सी अमेरिकन कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना इस्राईल सोडण्यास मंजूरी दिली आहे. दूतावास काही भाग, उदा. जेरुसेलमची ओल्ड सिटी आणि वेस्ट बँकमध्ये कर्मचाऱ्यांना प्रवासावर विना सुचना बंदी घालू शकतो. अमेरिकन नागरिकांना सल्ला दिला आहे की त्यांनी इस्राईल आणि वेस्ट बँक परिसरात प्रवास करण्याचा पुनर्विचार करावा. गाझात न जाण्याच्या सख्त सूचना आहेत. लेबनॉन आणि सिरीया सीमेपासून ४ किमी आणि गाझाच्या सीमेपासून ११.३ किमी आत जाऊ नये. लोकांनी सतर्क राहावे आणि गर्दी आणि निदर्शने यापासून दूर राहावे असाही सल्ला देण्यात आला आहे.

चीनने नागरिकांना इराण सोडण्यास सांगितले

दुसरीकडे चीनने देखील इराण सोडण्याचा सल्ला त्यांच्या नागरिकांना दिला आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालय आणि इराण येथील त्यांच्या दुतावासाने त्यांच्या नागरिकांना सध्या इराणला जाऊ नये असे म्हटले आहे. जे लोक आधीपासूनच इराणमध्ये आहेत त्यांनी सावध रहावे.आणि तेथून लागलीच बाहेर पडावे. इराण आणि आजूबाजूच्या देशातील चीनी दुतावासांना चीनी नागरिकांना तेथून बाहेर पडण्यासाठी कमर्शियल फ्लाईट वा जमीनीमार्गे बाहेर पडण्यास आवश्यक मदत करावी असेही आदेश चीनने दिले आहेत.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...