AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराणने घेतला अणू शास्त्रज्ञांचा मृत्यूचा बदला, चार दिवसानंतर समोर आला रिपोर्ट

इस्त्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अणू शास्त्रज्ञांचा मृत्यू झाला होता. आता इराणने इस्त्रायलच्या वेझमन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सला लक्ष्य केले. जे इस्रायलच्या वैज्ञानिक प्रतिष्ठेचे आणि तांत्रिक ओळखीचे प्रतीक मानले जाते.

इराणने घेतला अणू शास्त्रज्ञांचा मृत्यूचा बदला, चार दिवसानंतर समोर आला रिपोर्ट
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jun 20, 2025 | 8:34 AM
Share

Israel Iran Conflict News :इराण आणि इस्रायलमध्ये संघर्ष सुरु आहे. 13 जून रोजी इस्त्रायलने इराणवर हल्ला केला. या हल्ल्यात इस्त्रायलने इराणमधील महत्वाच्या लोकांना लक्ष्य केले. त्यात इराणचे सैन्य दल प्रमुख, कमांडर आणि अणू शास्त्रज्ञ यांचा मृत्यू झाला. त्यामुळे इराणला मोठा धक्का बसला. परंतु आता चार दिवसानंतर महत्वाचा रिपोर्ट समोर आला आहे. इराणने अणू शास्त्रज्ञांचा मृत्यूचा बदला घेतला आहे.

रविवारी पहाटे इराणी क्षेपणास्त्रांनी इस्रायलच्या महत्वाच्या केंद्रावर हल्ला केला. इस्त्रायलच्या वैज्ञानिक शक्तीचा पाया रचलेल्या ठिकाणीच हल्ला केला. इराणने इस्त्रायलच्या वेझमन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सला लक्ष्य केले. जे इस्रायलच्या वैज्ञानिक प्रतिष्ठेचे आणि तांत्रिक ओळखीचे प्रतीक मानले जाते. वेझमन इन्स्टिट्यूट येथेच इस्रायलचा पहिला संगणक विकसित झाला होता. इस्त्रायलचे आधुनिक संशोधन केंद्र म्हणून वेझमन इन्स्टिट्यूची ओळख आहे. त्यामुळे त्या ठिकाणी इराणकडून झालेला हल्ला केवळ लष्करी हल्ला नव्हता तर एक गंभीर प्रतीकात्मक हल्ला होता. इराणाने त्या माध्यमातून कोठर संदेश दिला. तुम्ही आमच्या शास्त्रज्ञांना मारले तर आम्ही तुमच्या ज्ञानाचे केंद्रच उद्ध्वस्त केले.

अनेक वर्षांची मेहनत गेली

इराणच्या हल्ल्यात वेझमन इन्स्टिट्यूटच्या दोन इमारती पूर्णपणे नष्ट झाल्या. त्यात एक बायोलॉजिकल सायन्स लॅब होती. दुसऱ्या इमारतीचे काम सुरु होते. जवळपास असणाऱ्या इतर इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे. खिडक्या तुटल्या आहेत. हाय टेक रिसर्च उपकरणांची राख झाली आहे. या हल्ल्यात कोणतीही जीवीत हानी झाली नाही. परंतु अनेक वर्षांची मेहनत वाया गेल्याचे शास्त्रज्ञांकडून सांगितले गेले. या प्रयोगशाळा पुन्हा सुरु करण्यासाठी अनेक वर्ष लागतील, असेही शास्त्रज्ञांनी म्हटले.

वेझमन इन्स्टिट्यूटचा लक्ष्य करण्यामागे इराणचा विशिष्ट उद्देश होता. वेझमन इन्स्टिट्यूटचा संबंध सरळ संरक्षण उद्योगांसोबत होता. या ठिकाणी झालेले संशोधन संरक्षण कंपन्यांना दिले जात होते. त्यामुळे ही संस्था केवळ वैज्ञानिक नाही तर सुरक्षेच्या मोर्चावरसुद्धा महत्वाची होती. त्याच ठिकाणी हल्ला करुन इस्त्रायलला मोठा धक्का इराणने दिला आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ