F-35 Shot Down : इराणने अमेरिकेचा अभिमान चिरडला, थेट प्रतिष्ठेवर घाव, 15 दिवसात दुसरं शक्तीशाली विमान पाडलं

F-35 Shot Down : इराणने 15 दिवसात अमेरिकेला दुसरा मोठा धक्का दिला आहे. हा थेट अमेरिकेच्या डिफेन्स इंडस्ट्रीच्या प्रतिष्ठेवर घाव आहे. अमेरिकेला ज्या विमानावर गर्व आहे, अभिमान आहे. रडारला सापडत नाही असा ते दावा करतात. तेच विमान इराणने पाडल्याचा दावा केला आहे.

F-35 Shot Down : इराणने अमेरिकेचा अभिमान चिरडला, थेट प्रतिष्ठेवर घाव, 15 दिवसात दुसरं शक्तीशाली विमान पाडलं
F-35 wreckage iran Claim
| Updated on: Apr 03, 2026 | 12:39 PM

इराणी सैन्याने एक मोठा दावा केला आहे. हा दावा खरा निघाला तर अमेरिकेसाठी तो एक मोठा झटका ठरेल. इराणच्या सैन्याने मरकजी प्रांतात F-35 फायटर जेट पाडल्याचा दावा केला आहे. F-35 हे अमेरिकेचं सर्वात अत्याधुनिक फायटर विमान आहे. या विमानाची टेक्नोलॉजी जगात सर्वोत्तम मानली जाते. त्याशिवाय हे अत्यंत महागडं फायटर विमान आहे. इराणच्या खातिम अल-अंबिया मुख्यालयाने हा दावा केला आहे. अल-जजीराने हे वृत्त दिलय. या विमानाच्या ढिगाऱ्यावर ब्रिटनच्या लेकनहीथ एअर बेसचं निशाण आहे. अमेरिकन एअर फोर्सचा हा ब्रिटनमधील महत्वपूर्ण तळ आहे. सध्या विमानाचा पायलट आणि मिशनबद्दल कुठलीही अधिकृत माहिती नाहीय.

यापूर्वी 19 मार्च रोजी इराणने अमेरिकेचं F-35A फायटर जेट पाडल्याचा दावा केला होता. हा दावा करताना त्यांनी या घटनेचा व्हिडिओ सुद्धा रिलीज केला होता. व्हिडिओत विमानावर हल्ला होताना दिसलेलं. पण ते विमान क्रॅश झाल्याला कुठेही दुजोरा मिळाला नव्हता. काही रिपोर्ट्सनुसार या एअरक्राफ्टच नुकसान झालं होतं. पायलटला किरकोळ मार लागला. पण त्याचे प्राण वाचले. हे प्लेन क्रॅश झालं नव्हतं. मिडिल ईस्टमधील एका यूएस एअरबेसवर या विमानाचं यशस्वीरित्या लँडिंग झालं होतं.

Loading...

अमेरिकेची प्रतिक्रिया काय?

इराणने यावेळी पुरावे देताना F-35 चे अनेक तुकडे दाखवले आहेत. कारण याआधी अमेरिकेने इराणचा F-35 पाडल्याचा दावा फेटाळून लावला होता. क्रॅशमुळे जोरदार स्फोट झाला. त्यामुळे वैमानिकासाठी इजेक्ट करण कठीण होतं असा इराणच्या मेहर न्यूज एजन्सीने दावा केलाय. US सेंट्रल कमांडने इराणच्या या दाव्यावर अजूनपर्यंत कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

ही विमान त्यांनी अमेरिकेकडून विकत घेतलेली

या युद्धात अमेरिकेने आतापर्यंत त्यांची 16 ते 20 सैन्य विमान, ड्रोन्स गमावली आहेत. यात फक्त काही विमान थेट इराणच्या हवाई कारवाई दरम्यान कोसळली आहेत. बहुतांश विमान एअर बेसवर असताना नष्ट झाली आहेत. इराणने अमेरिकेची 9 ते 12 MQ-9 Reaper ड्रोन्स पाडली आहेत. इराणने आता दोन F-35 पाडल्याचा दावा केला आहे. यात मार्च महिन्यात एफ-35 पाडल्याचा दावा CENTCOM ने फेटाळून लावला आहे. कुवैतच्या एअर डिफेन्स सिस्टिमने फायर करताना चूक केली. स्वत:चीच तीन F-15E Strike Eagle विमानं पाडली. ही विमान त्यांनी अमेरिकेकडून विकत घेतली होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us