AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Donald Trump: इराण युद्ध सोडा, अमेरिकन सैन्यात बंडाळी? ट्रम्प यांची आपल्याच लष्करावर सर्जिकल स्ट्राईक

Trump Fires Army Chief Randy George: इराण युद्धात प्रत्येक दिवशी डोनाल्ड ट्रम्प यांची निरर्थक बडबड ऐकून जग कंटाळले आहेत. या युद्धाला अमेरिकेतूनच मोठा विरोध सुरू आहे. लाखो लोक रस्त्यावर उतरले आहेत. तर यापूर्वी काही प्रमुखांनी राजीनामा दिला आहे. तर आता थेट लष्करावरच ट्रम्प यांनी सर्जिकल स्ट्राईक केली आहे. काय आहे अपडेट?

Donald Trump: इराण युद्ध सोडा, अमेरिकन सैन्यात बंडाळी? ट्रम्प यांची आपल्याच लष्करावर सर्जिकल स्ट्राईक
डोनाल्ड ट्रम्प
| Updated on: Apr 03, 2026 | 11:15 AM
Share

Trump Fires Army Chief Randy George: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण लष्कराविरोधातील तोफ आता स्वत:च्या लष्कराकडे वळवली आहे. अमेरिकेचे आर्मी चीफ ऑफ स्टाफ जनरल रँडी जॉर्ज यांच्याविरोधात ट्रम्प यांनी कारवाई केली आहे. त्यांना तात्काळ प्रभावाने सक्तीने निवृत्त केले आहे. त्यांना एका झटक्यात पदावरून दूर केले आहे. यापूर्वी चेअरमन ऑफ जॉईंट चीफ ऑफ स्टाफ जनरल सीक्यू ब्राऊन यांनाही तडकाफडकी पदावरून हटवण्यात आले. काही अधिकारी ट्रम्प यांच्या युद्धखोर भूमिकेच्या विरोधात असल्यानेच त्यांना ट्रम्प यांनी तातडीने पदावरून हटवल्याचा दावा करण्यात येत आहे. ट्रम्प यांच्या धोरणाला अमेरिकेतूनच आता मोठा विरोध होत असल्याचे समोर येत आहे. तर अमेरिकेच्या राजकारणात युरोपियन विरुद्ध इस्त्रायली मूळ असलेल्या अधिकाऱ्यांमधील वांशिक भेदही उफाळल्याचा आरोप करण्यात येत आहे. तर या युद्धातून ट्रम्प त्यांचा व्यवसाय मजबूत करत असल्याचाही आरोप होत आहे.

इराण युद्धासोबत घरगुती कलह

एकीकडे इराण विरोधात युद्ध सुरू असतानाच ट्रम्प यांना घरगुती कलहाला तोंड द्यावे लगात असल्याचे दिसते. पेंटागनमध्ये या युद्धामुळे अत्यंत तणावाचे वातावरण आहे. अनेक अधिकारी ट्रम्प यांच्या लहरी स्वभावाला अनेकजण वैतागले आहेत. गरज नसताना ट्रम्प यांनी युद्ध ओढावून घेतले. या युद्धामुळेच अमेरिकेत महागाई वाढल्याचे दावे अधिकारी करत आहेत. तर ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाचा देशाला फायदा होण्याऐवजी तोटा होत असल्याची ओरड सुरू झाली आहे. अमेरिका फर्स्ट धोरणामुळे अमेरिका जगात एकटी पडत असल्याचा आरोप बड्या अधिकाऱ्यांनी केला आहे. आपल्या विरोधात जो बोलेले अथवा आपले आदेश जो मानणार नाही त्याला तात्काळ पदावरून दूर करण्याचे सत्र ट्रम्प यांनी अवलंबल्याचे दिसून येते. आता लष्करातील या सुंदोपसुंदीमुळे अमेरिकेतील लष्करात अस्थिरता असल्याचे बोलले जात आहे.

बायडेन काळात रँडी जॉर्ज यांची नियुक्ती

अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेग्सेथ यांनी रँडी जॉर्ज यांना व्यक्तिगतरित्या निवृत्त होण्यास सांगितले आहे. पेंटागनचे प्रवक्ते शीन पारनेल यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. जॉर्ज यांना 41 व्या चीफ ऑफ आर्मी स्टाफचे पद सोडण्यास सांगण्यात आले. तात्काळ प्रभावाने त्यांना सक्तीची निवृत्ती देण्यात आली. जनरल जॉर्ज यांना 2023 मध्ये बायडेन यांच्या सरकारमध्ये नियुक्ती देण्यात आली होती.

या सर्व बदलामुळे ट्रम्प कमकुवत ठरत असल्याचे बोलले जात आहे. ते कमकुवत पडत असल्यानेच आता अशा पद्धतीने ते दबाव टाकत असल्याचे म्हटले जात आहे. यापूर्वीच्या सरकारने केलेल्या नियुक्तीवर ट्रम्प यांचा विशेष राग आहेत. हे अधिकारी आपल्यासाठी काम करत नसल्याचे ट्रम्प यांना वाटत असल्याचे मानले जात आहे. ट्रम्प यांनी स्वच्छता अभियान हाती घेतल्याचाही दावा करण्यात येत आहे. ट्रम्प अशा कारवाया करून त्यांची प्रशासनावरील पकड मजबूत करू इच्छित असल्याचे दिसते.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा