AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

America: ट्रम्प युद्धात गुंतले, तिकडे अमेरिकेत तयार झाला नवीन देश! चलन, पासपोर्ट, नागरिकताही मोफत, तो सुलतान कोण?

The Slowjamastan in the Middle of America: डोनाल्ड ट्रम्प हे इराणविरोधातील युद्धात गुंतले आहेत. त्यांच्या वायफळ बडबडीने जगाला परिणाम भोगावे लागत आहेत. त्यातच अमेरिकेला अजून एक मोठा झटका बसला आहे. अमेरिकेच्या मध्यभागीच एक देश तयार झाल्याचा दावा करण्यात येत आहे. काय आहे ती मोठी अपडेट? कोण आहे तिथला सुलतान?

America: ट्रम्प युद्धात गुंतले, तिकडे अमेरिकेत तयार झाला नवीन देश! चलन, पासपोर्ट, नागरिकताही मोफत, तो सुलतान कोण?
स्लोजमास्तान
| Updated on: Apr 02, 2026 | 2:03 PM
Share

The Slowjamastan in the Middle of America: कॅलिफोर्नियाच्या कोचेला व्हॅली आणि मॅक्सिको या देशाच्या सीमेवर एक देश जन्माला आला आहे. हा भाग वाळवंटी आहे. येथे झुडुपांशिवाय आणि वाळूशिवाय काहीच नाही. द रिपब्लिक ऑफ स्लोजमास्तान असे या देशाचे नाव आहे. या 11 एकर जागेवर हा देश तयार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या देशाच्या नावात जरी रिपब्लिक असले तरी या देशावर एक हुकूमशाहची सत्ता आहे. हा देश एका रेडिओ डीजेने तयार केला आहे. विशेष म्हणजे या हुकुमशाहच्या देशात 25,000 हून अधिक लोकांनी आश्रय घेतला आहे. आता हा सर्वच प्रकार डोनाल्ड ट्रम्प यांना सुद्धा अचंबित करणार आहे.

या देशाचे कायदे पण विचित्र

स्लोजमास्तान हा काही इतर देशांसारखा नाही. हा देश विचित्र लोकांचा आणि सनकी हुकुमशाहाचा आहे. इथे त्याने विचित्र कायदे तयार केले आहेत. या देशात क्रॉस चप्पल घातल्यास शिक्षा होते. तर ई-मेल पाठवताना ‘Reply-all’ वर बंद घालण्यात आली आहे. येथे सुसाट कार इतर वाहनं चालवण्यास पूर्ण परवनगी आहे. या देशाचा राष्ट्रीय पशू हा रॅकून आहे.

असा तयार झाला देश

रेडिओ जॅकी रँडी याला जगभरात फिरण्याची आवड होती. पण 2020 मध्ये लॉकडाऊन लागले. त्यामुळे या रँडीचे तुर्कमेनिस्तान या देशात जाण्याचे स्वप्न भंगले. त्याचवेळी जर आपण दुसऱ्या देशात जाऊ शकत नसलो तरी स्वतःचा देश का बनवू शकत नाही असा विचार त्याच्या मनात आला. त्याने लागलीच 2021 मध्ये जवळपास 15 लाख रुपयांची एक वाळवंटी जमीन खरेदी केली. तिथे स्वत:चा झेंडा रोवला आणि तो देशाचा गाडा हाकत आहे.

पासपोर्ट, चलन आणि हो सैन्य ही

स्लोजमास्तान हा देश केवळ कागदावर आहे असे नाही. तर या देशाकडे स्वतःचे थोडे का असेना सैन्य आहे. येथे इतर देशातून येणार्‍या नागिरकांसाठी एक चेकपोस्ट आहे. या देशाचा झेंडा आणि चलन आहे. इतकेच नाही तर या देशाचे राष्ट्रगीतही आहे. तर सैन्य म्हणाल तर ती एक कमाल आहे. एक जुनी नौका ही नौसेना तर काही लोक हे सैनिक आहेत. या देशाची नागरिकता मोफत मिळते. गंमत म्हणून या देशाचे 120 जणांनी दुहेरी नागरिकत्व घेतले आहेत. या देशाची लोकसंख्या वाढवण्यावर भर देण्यात येत आहे. विशेष म्हणजे जर तुम्ही काही शुल्क भरले तर तुम्हाला या देशात सहज खासदार आणि राजदूत होता येते. पण त्यासाठी पैसे मोजावे लागतात. रँडी हा या देशाचा सुलतान आहे आणि 2027 मध्ये होणाऱ्या लहान देशांच्या ‘MicroCon’ या मंचावर हा देश प्रतिनिधित्व करणार आहे.

Follow Us
वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा
मोठी बातमी! वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा आक्रोश
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण! "काका मला मारू नका, मी...
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण!
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा Video समोर
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिय
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिया सुळेंनी पक्षातील Inside Story सांगितलीच
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले..
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले...
थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
मोठी बातमी! थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान
राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
Bachchu Kadu | राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर
Pandharpur Wari | टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर दिवेघाट सर करत वारी चालली पंढरी
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं,
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं, कोण आहे पवार कुटुंबातील होणारी सून?