AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NASA Artemis Rocket Launch: चंद्र आहे साक्षीला! कोणत्याही चाचणीशिवाय नासाचे आर्टेमिस मिशन लाँच, 50 वर्षानंतर चांदोबाची अचानक आठवण का?

NASA Artemis Rocket Launch : नासाने आर्टेमिस 2 मिशन कोणतीही चाचणी न करताच अंतराळात धाडल्याने अंतराळ विज्ञान क्षेत्रात गजहब उडाला आहे. चंद्रांची 50 वर्षांनंतर आठवण अमेरिकेला एकाकी आलेली नाही. त्याविषयीच्या चर्चा होत आहेत. वेट टेस्टिंग न करताच NASA ने मिशन लाँच केले आहे.

NASA Artemis Rocket Launch: चंद्र आहे साक्षीला! कोणत्याही चाचणीशिवाय नासाचे आर्टेमिस मिशन लाँच, 50 वर्षानंतर चांदोबाची अचानक आठवण का?
नासाची चांदोबाला सादImage Credit source: गुगल
| Updated on: Apr 02, 2026 | 12:00 PM
Share

Artemis 2 mission to Moon : नासाने आर्टेमिस II मिशन केनेडी अंतराळ केंद्रावरून लाँच केले. अमेरिकेच्या वेळेनुसार, संध्याकाळी 6 वाजून 24 मिनिटांनी (भारतीय वेळेनुसार, गुरुवारी भल्या पहाटे 3:54 वाजता) हे मिशन सुरु झाले. या अंतराळ मोहिमेत चांदोबाला फेरी मारून येतील. या मोहिमेत चार अंतराळवीर सहभागी आहेत. विशेष म्हणजे नासाने आर्टेमिस II मिशनसाठी आवश्यक असलेली वेट टेस्टिंग पूर्ण केली नाही. यापूर्वी फेब्रुवारीत ही टेस्ट झाली त्यावेळी गळती होत असल्याचे समोर आले होते. पण ही अडचण दूर करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आणि कोणत्याही चाचणीशिवाय आता यान हे चांदोबाकडे झेपावले आहे. आर्टेमिस II भविष्यात चंद्रावर उतरणे आणि मंगळ मोहिमेसाठी ही तयारी सुरू आहे. मानवासहित असलेला हा नासाची मोठी अंतराळ मोहिम मानल्या जात आहे.

चंद्राभोवती फेर धरून 10 दिवसानंतर यान पृथ्वीवर

आर्टेमिस 2 मिशनमध्ये 4 अंतराळवीर सहभागी झाले आहेत. यामध्ये रीड वाईजमॅन (मोहिम प्रमुख), विक्टर ग्लोवर (मोहिम चालक), क्रिस्टीना कोच (मोहिम तज्ज्ञ) आणि कॅनडा येथील अंतराळ संस्थेचे सदस्य जैरेमी हँसन (मोहिम तज्ज्ञ) आहेत. इंटिग्रिटी या अंतराळ यानातून हे सर्व अंतराळवीर चंद्राला प्रदक्षिणा घालतील. एक फेर धरून हे अंतराळ वीर 10 दिवसानंतर पृथ्वीवर परत येतील. प्रेक्षपण यान आणि ओरियन अंतराळयानाची ही पहिली मानव चाचणी आहे. त्यामुळे भविष्यातील दीर्घकालीन चंद्र संशोधनासाठी आणि मानवाला मंगळावर पाठवण्यासाठी हे तंत्रज्ञान विकसीत करण्यात येत आहे.

आर्टेमिस II मिशन का इतके खास?

या मोहिमेदरम्यान अंतराळ प्रवासी, अंतराळवीर सर्वात दूरवरच्या प्रवासाचा नवीन विक्रम नावावर नोंदवतील. यापूर्वी हा रेकॉर्ड अपोलो 13 मिशनच्या नावावर होता. आर्टेमिस II मिशनच्या माध्यमातून सिस्टिमचा निरीक्षण करण्यात येईल. यामध्ये आपत्कालीन प्रक्रिया, रेडिएशनच्या माध्यमातून सुरक्षा आणि लेझरवर आधारीत अत्याधुनिक संवादाचे तंत्रज्ञान विकसीत होईल. ही मोहिम आगामी अंतराळ अभियानासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या मोहिमेतंर्गत चंद्रावर पुन्हा मानवाला उतरवण्याचा आणि मंगळ ग्रहावर सुद्धा अंतराळवीराला उतरवण्याची तयारी करण्यात येत आहे. या मोहिमेचा केवळ इतकाच एक उद्देश नाही. चंद्रावर मानवी वसाहत तयार करण्यासाठी आणि मंगळ ग्रहावरही असाच वसाहतीचा प्रयोग राबवण्यासाठी ही मोहिम अत्यंत आवश्यक मानली जात आहे.

Follow Us
वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा
मोठी बातमी! वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा आक्रोश
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण! "काका मला मारू नका, मी...
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण!
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा Video समोर
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिय
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिया सुळेंनी पक्षातील Inside Story सांगितलीच
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले..
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले...
थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
मोठी बातमी! थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान
राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
Bachchu Kadu | राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर
Pandharpur Wari | टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर दिवेघाट सर करत वारी चालली पंढरी
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं,
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं, कोण आहे पवार कुटुंबातील होणारी सून?