इराणच्या धमकीने फुटला अमेरिकेचा घाम, पळता भुई कमी, थेट जगात मोठी खळबळ..

अमेरिकेकडून हिंद महासागरात इराणी युद्धनाैकेवर अत्यंत मोठा हल्ला करण्यात आला. ही युद्धनाैका पूर्णपणे बुडाला. या हल्ल्यानंतर आता मोठी धमकी इराणकडून देण्यात आली, ज्यानंतर जगाची झोप उडाल्याचे बघायला मिळत आहे.

इराणच्या धमकीने फुटला अमेरिकेचा घाम, पळता भुई कमी, थेट जगात मोठी खळबळ..
US Iran War
| Updated on: Mar 05, 2026 | 9:41 AM

इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष वाढला आहे. भारतातून युद्धाचा सराव करून इराणच्या दिशेने निघालेल्या इराणी युद्धनाैकेवर अमेरिकेने मोठा हल्ला केला. 180 सैनिक या युद्धनाैकेवर होते. कित्येक सैनिक बेपत्ता असून 87 जणांचा मृत्यु झाला. श्रीलंकेकडून हल्ल्यानंतर काही वेळातच बचावकार्य राबवण्याते आले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. अमेरिकेने मान्य देखील केले की, आम्हीच इराणी युद्धनाैका बुडवली. या युद्धाचा परिणाम फक्त तीन देशांपुरता मर्यादित राहिला नसून सर्वच देशांवर होत आहे. मात्र, जागतिक बाजारावर युद्धाचा परिणाम तात्पुरता असल्याचे अमेरिकेने म्हटले. पाकिस्तान आणि दुबईतून अमेरिकेने नागरिकांनी तात्काळ बाहेर पडावे, असे अमेरिकेने आपल्या नागरिकांना सांगत हाय अलर्ट जारी केला. अमेरिका इराणला सर्वच बाजूने घेरण्याकरिता प्रयत्न करत आहे. भारतातून इराणच्या दिशेने येणाऱ्या आपल्या युद्ध नाैकेवर झालेल्या हल्ल्यानंतर आता इराण चांगलाच संतापला. इराणने थेट मोठी धमकीच दिली आहे.

इराणने फक्त अमेरिका आणि इस्त्रायलच नाही तर जगाला घाम फोडणारी धमकी दिली. इराणने थेट म्हटले की, इस्त्रायलच्या परमाणु केंद्रांना टार्गेट करू… यामुळे या युद्धात आता संपूर्ण जगावर अण्वस्त्र युद्धाचे संकट आहे. जर इराणकडून खरंच इस्त्रायलच्या परमाणु केंद्रांना टार्गेट करून हल्ला करण्यात आला तर त्याचा अत्यंत वाईट परिणाम जगाला भोगावा लागेल. सर्वकाही संपेल.

अमेरिकेकडून इराणी युद्धनाैकेवर केलेल्या हल्ल्यानंतर आनंद व्यक्त करण्यात आला. मात्र, इराणकडून या आनंदावर काही वेळातच पाणी फिरवण्यात आले. थेट परमाणु केंद्रांवर हल्ला करण्याची धमकी देण्यात आली. इराणमध्ये मोठा विनाश सुरू आहे. त्यांच्या सर्वाेच्च नेत्यांची हत्या केली जात आहे, प्रमुख शहरांना टार्गेट केले जात आहे.

इराणमध्ये मोठा विनाश सुरू आहे. सरकारी इमारती, कॉलेज, शाळांना टार्गेट केले जात आहे. इराण देखील या हल्ल्यांना सडेतोड उत्तर देत आहे. इस्त्रायल, दुबई आणि ज्या देशांमध्ये अमेरिकेचे तळ आहेत, अशा ठिकाणी इराणकडून मोठे हल्ले केले जात आहेत. पुढील काही आठवडे हे युद्ध सुरू राहणार असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.

Follow Us