AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराणमधील विनाशावर मी प्रचंड आनंदी… डोनाल्ड ट्रम्प यांचे थेट विधान, घातक प्लॅन सांगत…

Donald Trump on Middle East War : अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धात आता नुकताच डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत मोठे विधान केले. अमेरिका आणि इस्त्रायलकडून मोठे हल्ले सतत इराणवर केले जात आहेत. इराणी नागरिक बंकरमध्ये लपून बसले आहेत. स्थिती भयंकर आहे.

इराणमधील विनाशावर मी प्रचंड आनंदी... डोनाल्ड ट्रम्प यांचे थेट विधान, घातक प्लॅन सांगत...
US President Donald Trump
| Updated on: Mar 05, 2026 | 8:45 AM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच इराणसोबतच्या युद्धाबाबत अत्यंत मोठे विधान केले. इराणवर अमेरिका आणि इस्त्रायल मिळून हल्ला करत आहे. परिस्थिती अधिक तणावात बघायला मिळतंय. इराणच्या प्रमुख शहरांना टार्गेट केले जात आहे. युद्ध सुरू होऊन पाच ते सहा दिवस झाले नाहीत तोवरच अमेरिका आणि इस्त्रायलच्या संयुक्त हल्ल्यात इराणच्या दोन सर्वाेच्च नेत्यांची हत्या करण्यात आली. त्यांना हल्ल्यात ठार करण्यात आले. इराणकडून त्यांच्या तिसऱ्या सर्वाेच्च नेत्याच्या नावाची घोषणा करण्यात आली. आखाती देशात स्थिती अत्यंत गंभीर आहे. अनेक भारतीय लोक अडकले आहेत. दुबईसह, कतार, कुवेत अशा अनेक देशांवर हल्ले इराणकडून केले जात आहेत. इराणकडून आम्ही चर्चेसाठी तयार असल्याचेही सांगण्यात आले. मात्र, आता चर्चेचा वेळ निघून गेल्याचे अमेरिकेने म्हटले.

इराणमध्ये विनाश सुरू आहे. नुकताच सध्याच्या परिस्थितीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत मोठे विधान केले. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, या युद्धात आम्ही मजबूत स्थितीत आहोत. त्यांचे नेतृत्व झपाट्याने कमी होत आहे. मध्य पूर्वेत सतत बॉम्बस्फोट होत आहेत. अमेरिका आणि इस्रायली सैन्य संयुक्तपणे कारवाई करत आहे.

पुढे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, आम्ही श्रीलंकेच्या जवळ इराणी युद्धनाैका बुडवली. त्यांचा बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा साठा वेगाने नष्ट केला जात आहे. जर अण्वस्त्रे वेड्या लोकांच्या हाती पडले तर ते खूप जास्त वाईट आहे. त्यांच्यावर युद्ध करणे आवश्यक होते. जे जे नेते बनत आहेत, त्यांना मारले जात आहे. मी खूप जास्त खूश आहे.

आम्ही युद्धात पुढे सरकत आहोत. हल्ल्यामुळे सध्या इराणी सैन्य कमकुवत झाले आहे. ट्रम्प यांनी युद्धोत्तर संपूर्ण योजना जाहीर केलेली नाही. अमेरिका आणि इराण युद्धाचा परिणाम पूर्ण जगावर होत आहे. इराणकडून महत्वाचा मार्ग बंद करण्यात आल्याने भारतात होणारी एलपीजी गॅसची आयात बंद झाली. जहाज दिसताच पेटवून देण्याचा इशारा इराणकडून देण्यात आला.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...