जगात हाहाकार! इराणची जगाला मोठी धमकी, ज्याची भीती तेच घडले, थेट भारतातही..
LPG Price : इराण आणि अमेरिका यांच्यात पुन्हा एकदा तणाव वाढला आहे. त्यामध्येच इराणकडून देण्यात आलेल्या धमकीने तणाव पुन्हा वाढला. इराणच्या या धमकीचा फटका थेट भारताला बसू शकतो. होर्मुज खाडीबाबत इराणने धमकी दिली.

इराण आणि अमेरिका युद्धाचा परिणाम जगावर झाला. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर युद्ध पुन्हा पेटले आहे. त्यामध्येच अमेरिकेकडून इराणमध्ये केल्या जाणाऱ्या हल्ल्यादरम्यान इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्ड कॉर्प्स यांनी आक्रमक भूमिका घेत जगाला धमकी दिली. होर्मुज खाडीतून एक थेंबही कच्चे तेल आणि गॅस जाऊ देणार नसल्याचे त्यांनी म्हटले. इराणच्या या धमकीने जगात मोठा हाहाकार उडाला. होर्मुज खाडीत झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेने इराणवर मोठे हल्ले केले. त्यानंतर इराणकडून होर्मुज खाडी बंद करण्यात आली. आता त्यामध्येच होर्मुज खाडीतून एकही थेंब तेल जाणार नसल्याची धमकी इराणने जगाला दिली. याचा परिणाम संपूर्ण जगावर होणार आहे. ज्यामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ होताना दिसतंय.
इराणच्या या धमकीचा फटका भारतालाही बसणार आहे. भारतात जवळपास एलपीजी गॅस हा होर्मुज खाडीतूनच दाखल होतो. इराणने एक थेंबही गॅस आणि तेल जाणार नसल्याचे स्पष्ट केल्याने भारतात पुन्हा एकदा एलपीजी गॅसचे संकट निर्माण होऊ शकते. भारतात कच्च्या तेलाची इतकी जास्त समस्या नाही. कारण भारत इतर मार्गे कच्चे तेल भारतात आणतो. मात्र, एलपीजी गॅसची चिंता अधिक आहे.
काही दिवसांनंतर पुन्हा एकदा इराण आणि अमेरिका यांच्यात संघर्ष पेटला आहे. ज्याचा परिणाम जगावर होऊ शकतो. भारत 60 टक्के एलपीजी गॅस आयात करतो. त्यापैकी 90 टक्के एलपीजी गॅस हा भारतात होर्मुज खाडीतूनच येतो. भारत सरकार गॅस बुकिंगच्या नियमात काही मोठे बदल करू शकते. हा सर्वसामान्यांसाठी मोठा झटका म्हणावा लागू शकतो.
इराणच्या धमकीनंतर अमेरिकेने मंगळवारी इराणच्या सैन्य ठिकाणांना टार्गेट करून हल्ले केले होर्मुज खाडी खुली करण्यासाठी अमेरिका एकप्रकारे मोठा दबाव इराणवर टाकत आहे. भारत सरकारने एलपीजी गॅसच्या किमतीमध्ये कोणतेही नवीन बदल केले नाहीत. इंडियन ऑयलनुसार, दिल्लीत 14.2 किलो घरगुती सिलेंडर 942 रूपये आणि 19 किलो एलपीजी गॅस सिलेंडर 2930 रूपयांना आहे. जर स्थिती हीच राहिली तर एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये सरकारकडून काही मोठे बदल केले जाऊ शकतात.