AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगाला ज्याची भीती तेच घडले, इराण युद्धात रशिया थेट मैदानात?, थेट इराणला पाठवले TU-214PU..

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध पेटले आहे. या युद्धादरम्यानच आता रशियाकडून मोठा निर्णय घेण्यात आला. रशिया थेट या युद्धात उतरला. इराणच्या बाजूने रशिया या युद्धात उतरल्याने मोठी खळबळ उडाली.

जगाला ज्याची भीती तेच घडले, इराण युद्धात रशिया थेट मैदानात?, थेट इराणला पाठवले TU-214PU..
Vladimir Putin
| Updated on: Jul 14, 2026 | 7:19 AM
Share

इराण आणि अमेरिका यांच्यात तणाव वाढला आहे. आता इराण आणि अमेरिका युद्धात थेट रशिया उतरल्याचे सांगितले जातंय. या युद्धात रशियाने थेट मोठा निर्णय घेतला. रशियाने इराणमध्ये सर्वात सुरक्षित एअरबोर्न कमांड एअरक्राफ्ट पाठवले आहे. प्लाईट डेटानुसार, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या आदेशानंतर एलीट TU-214PU विमान तेहरानमध्ये पोहोचले आहे. हे रशियाचे अत्यंत महत्वाचे आणि घातक विमान आहे. रिपोर्टनुसार, टुपोलेव डिझाइन ब्यूरो खास विमान कमांड पोस्टचे काम करतो. TU-214PU रशियाच्या अध्यक्ष कार्यालय क्रेमलिन मोबाईल कमांड पोस्ट आहे. त्याच अत्यंत अत्याधुनिक सुरक्षित संचार प्रणाली, एन्क्रिप्टेड लिंक्स, सॅटेलाईट कम्युकेशन आणि परमाणू हल्ल्याचे सिस्टम म्हणून काम करते. या विमानाची खासियत म्हणजे कोणत्याही हंगामात आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये हे विमान काम करते.

हे विमान तेहरानमध्ये पाठवून मोठी शक्ती इराणला रशियाने दिलीये. अमेरिका सुरूवातीपासूनच रशिया आणि चीन युद्धात इराणला मदत करत असल्याचा आरोप करत आहे. त्याच आता जाहीरपणे रशिया युद्धात उतरल्याचे बघायला मिळतंय. रशिया आणि इराण यांच्यात अनेक वर्षांपासून सैन्य आणि गुप्तचेहर माहितीची देवाण घेवाण होते. आता रशियाने स्पष्ट संकेत दिले आहेत की, या काळात इराणला रशिया कोणत्याही परिस्थितीमध्ये एकटे सोडणार नाही.

रशिया आता प्रत्येक गोष्टीत रशियाची साथ देत आहे. अमेरिकेने इराणविरोधात मोठ्या प्रमाणात युद्ध सुरू केले. एकाच रात्री तब्बल 140 ठिकाणी मोठे हल्ले इराणवर अमेरिकेने केला. यादरम्यानच रशियाने मोठे पाऊल उचलले. इराणच्या रडार सिस्टमला टार्गेट करून अमेरिका हल्ले करत आहे. दुसरीकडे काल झालेल्या हल्ल्यांना इराणकडूनही प्रतिउत्तर देण्यात आले.

आता थेट रशिया युद्धात जाहीरपणे उतरल्याचे बघायला मिळतंय. मोठी मदत रशियाने इराणला दिली. रशियाने थेट इराणला मदत केल्याने आता अमेरिका नक्की काय भूमिका घेते याकडे सर्वांच्या नजरा आहेत. रशिया या युद्धात सुरूवातीला शांततेची भूमिका घेताना दिसला. आता त्यांच्याकडून जाहीरपणे इराणला सपोर्ट केला जात आहे. युक्रेन युद्धामुळे अमेरिकेने रशियावर अनेक निर्बंध लादली आहेत. त्यात जाहीरपणे रशिया इराणच्या समर्थनार्थ मैदानात उतरला. ज्याने अधिकच खळबळ उडाली.

Follow Us
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक