AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीय कर्मचारी असलेल्या जहाजावर भीषण हल्ला, अमेरिकेने घेतला थेट बदला, रात्रभर..

इराण आणि अमेरिका यांच्यात तणाव वाढला आहे. अमेरिकेने होर्मुज खाडीत इराणकडून करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर रात्रभर हल्ले केले. इराणकडूनही अमेरिकी लष्कराच्या तळांवर हल्ले केले. आखाती देशात प्रचंड तणाव वाढला आहे.

भारतीय कर्मचारी असलेल्या जहाजावर भीषण हल्ला, अमेरिकेने घेतला थेट बदला, रात्रभर..
US attack on Iran
| Updated on: Jul 13, 2026 | 8:58 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्ध पुन्हा पेटले आहे. त्यामध्येच भारतीय कर्मचारी असलेल्या जहाजावर मोठा हल्ला इराणकडून करण्यात आला. त्यानंतर अमेरिका संतापली आहे. अमेरिकेने इराणला सळो की पळो करून सोडले. इराणच्या अनेक भागात अमेरिकेने मोठे हल्ले केले. अमेरिकेने इराणच्या तब्बल 140 सैन्य ठिकाणांवर मिसाईल हल्ले केले. अमेरिकेने होर्मुज खाडीतून जाणाऱ्या जहाजावरील हल्ल्याचा बदला घेतला. या जहाजावर भारतीय कर्मचारी होते. 11 जण ज्यावेळी हल्ला झाला, त्यावेळी जहाजावर होते. त्यापैकी 1 जण अजूनही बेपत्ता आहे. अल जजीराच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेने इराणच्या 8 शहरांवर हल्ला केला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, खुजिस्तानमध्ये धमाक्यांचे आवाज ऐकू आली. अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांनंतर इराणकडूनही खाडी देशांवर हल्ले केले जात आहेत.

बहरीन सरकारने लोकांना अतिमहत्वाच्या कामांशिवाय घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला. इराणकडून कुवेत, कतार, जॉर्डन आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये असलेल्या अमेरिकन लष्कर तळांना टार्गेट केले जात आहे. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा युद्ध पेटताना दिसत आहे. अमेरिकेच्या लष्कराने सांगितले की, रविवारी रात्री इराणच्या कमीत कमी 140 लष्कर तळांना टार्गेट करत हल्ले करण्यात आली.

लॉन्च साईट आणि त्यांची लष्करी ताकद मोठ्या प्रमाणात नष्ट करण्यात आली. हेच नाही तर इराणच्या नाैसेनेच्या जहाजांवरही बॉम्ब टाकण्यात आली.अमेरिकेने केशम व्दीपलाही टार्गेट केले. फारस खाडीजवळील व्दिपवर 150000 लोक राहतात. अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव वाढत असल्याने जग संकटात आहे. जागतिक बाजारात पुन्हा एकदा कच्च्या तेलाच्या किमती वाढताना दिसत आहेत.

कतारच्या मध्यस्थीला यश आले होते. दोन्ही देशाकडून तात्पुरती युद्धविरामाची घोषणा करण्यात आली. मात्र, खामेनेई यांच्या अंत्यसंस्कारानंतर स्थिती पुन्हा एकदा बदलताना दिसली. अमेरिकेकडून होत असलेल्या हल्ल्यांदरम्यान इराणकडून होर्मुज खाडी बंद करण्यात आली. होर्मुज खाडी अजून काही दिवस बंद राहिली तर कच्च्या तेलाची मोठी समस्या निर्माण होऊ शकते. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या भाव झपाट्याने वाढत आहेत. तेल कंपन्यांवरील दबाव वाढलाय.

Follow Us
मोठी दुर्घटना टळली! डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवासी लिफ्ट मधेच अडकली,
मोठी दुर्घटना टळली! डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवासी लिफ्ट मधेच अडकली, 15 मिनिटांसाठी....
My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर...
गोल्डनंतर आता प्लॅटिनम अवॉर्ड; My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर
महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती
Mahayuti : Eknath Shinde : महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती, नेमकं कारण काय?
राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक....
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी पुढची रणनीती ठरणार?
भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
Shekhar Bhoyar : भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली...
Shivsena : शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली; ठाकरे-शिंदे गटाचं लक्ष नव्या तारखेकडे
जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
Gold-Silver Rate Update : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत..
Price Rate Hike : सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत सर्वच महाग, काय आहेत नवे दर?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत शिंदेंनी दिली.....
Eknath Shinde On Thane Purneker Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात....
Bihar Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात विद्यार्थी संघटनांची जोरदार घोषणाबाजी