अमेरिकेने नाकेबंदी उठवली नाही तर… इराणची हादरवणारी धमकी, जगात हाहाकार, थेट..

गेल्या 24 तासांमध्ये इराण आणि अमेरिका युद्धात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. स्थिती भयंकर आहे. होर्मुज खाडी इराणकडून खुली करण्यात आली. पण स्थिती अजूनही सामान्य नाही. इराणकडून अमेरिकेला धमकी देण्यात आली.

अमेरिकेने नाकेबंदी उठवली नाही तर... इराणची हादरवणारी धमकी, जगात हाहाकार, थेट..
Mojtaba Khamenei
| Updated on: Apr 18, 2026 | 10:46 AM

इराण आणि अमेरिका युद्धात अनेक घडामोडी घडत आहे. इस्लामाबादमध्ये सोमवारी चर्चेचे आयोजन करण्यात आले. होर्मुज खाडी जगासाठी किती जास्त महत्वाची आहे हे या युद्धात स्पष्ट झाले. होर्मुज खाडीच्या मुद्द्यात अमेरिकेला एकटे पाडून ब्रिटिनने मोठा निर्णय घेतला. हेच नाही तर आता ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टारमर यांनी जाहीर केले की, होर्मुज खाडीच्या सुरक्षेसाठी डझनहून अधिक देश तयार आहेत. बहुराष्ट्रीय सुरक्षा मोहिमेच्या तयारीवर चर्चा करण्यासाठी फ्रान्स आणि ब्रिटनने पॅरिसमध्ये बैठकीचे आयोजन केले. या बैठकीचे निमंत्रण भारत आणि चीनलाही होते. पण अमेरिकेला या बैठकीपासून दूर ठेवण्यात आले. लेबनॉनमधील शस्त्रसंधीनंतर इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी होर्मुज खाडी खुली करण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेने आमचा जो निधी गोठला आहे, तो निधी मुक्त करण्याबाबतही करारात मोठा मुद्दा ठेवण्यात आला.

इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी बोलताना म्हटले की, होर्मुज खाडीतून वाहतूक ही इराणकडून सुनिश्चित करण्यात आलेल्या मार्गातूनच होईल. आयआरजीसीने निर्देश दिले आहेत की, सर्व जहाजांना होर्मुज खाडीतून जाताना परवानगी घेणे आवश्यक आहे. नागरी जहाजांना होर्मुज खाडीतून जाण्याची परवानगी असेल. पण इराणच्या मदतीशिवाय किंवा परवानगी शिवाय होर्मुज खाडी पार करणे धोक्याचे आहे.

यादरम्यानच इराणकडून स्पष्ट सांगण्यात आले की, फक्त नागरी जहाजांना परवानगी आहे, लष्करी जहाजांना प्रवेश पूर्णपणे बंदी असणार आहे. यादरम्यानच इराणकडून अत्यंत मोठा इशारा देण्यात आला. अमेरिकेने जर बंदरावरील नाकेबंदी कायम ठेवली तर आम्ही प्रत्युत्तर देऊ अशी मोठी धमकी इराणकडून देण्यात आली.

परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, जर अमेरिकेने इराणच्या आर्थिक हितसंबंधांना टार्गेट करून इराणच्या बंदराला लक्ष करणे सुरूच ठेवले तर आम्ही कठोर भूमिका घेऊ. एकीकडे युद्धबंदी करार चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे पुन्हा एकदा मोठा इशारा इराणकडून देण्यात आला.इराण कोणत्याही पद्धतीने माघार घेत नाही. अमेरिकेने अजूनही नाकेबंदी काढली नाही. ज्यामुळे इराणचे जहाज बंदरातून बाहेर पडत नाहीयेत.

Follow Us