AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत चीनच्या निर्णयाने जगात मोठी खळबळ, पहिल्याच थेट बंद दाराआड..

इराण आणि अमेरिका युद्धात जगात संतापाची लाट आहे. या युद्धात आखाती देशांसोबतच इतरही देश भरडले जात आहेत. स्थिती गंभीर आहे. इराणकडून मोठी घोषणा करत होर्मुज खाडी खुली करण्यात आली. संधीचे सोने भारत आणि चीनने केल्याचे बघायला मिळत आहे.

भारत चीनच्या निर्णयाने जगात मोठी खळबळ, पहिल्याच थेट बंद दाराआड..
India and China
| Updated on: Apr 18, 2026 | 8:58 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्ध भडकले. युद्ध फार फार चार आठवडे चालेल असा अंदाज डोनाल्ड ट्रम्प यांचा होता. मात्र, प्रत्यक्षात सर्वकाही उलटे घडले. ज्याचा साधा विचारही डोनाल्ड ट्रम्प यांनी केला नव्हता असे घडले. अमेरिकेच्या विरोधात जगातील अनेक देश भूमिका घेताना दिसले. डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुज खाडी सुरक्षित करण्याकरिता स्वत: डोनाल्ड ट्रम्प यांनी काही देशांचे नाव घेऊन मदत मागितली होती. तुमच्या देशाच्या युद्धनाैका अमेरिकेत पाठव, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी मदत मागूनही एकदी देश त्यांच्या मदतीकरिता पुढे आला नाही. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची थणथण बघायला मिळाली. इराण आणि अमेरिका युद्धात भारत आणि चीन जवळ आल्याचे बघायला मिळत आहे. चीनने या युद्धात ज्याप्रकारे आपली भूमिका ठेवली तशीच भारतानेही ठेवली. अमेरिकेने भारतावर 200 टक्के टॅरिफ लावल्यानंतर चीन मदतीला धावून आला होता. तेव्हापासून भारत आणि चीनमधील संबंध स्थिर दिसत आहेत.

डोनाल्ड ट्रम्प होर्मुज खाडी करत बसले असताना भारत आणि चीनने मोठा डाव खेळल्याचे बघायला मिळत आहे. भारत आणि चीनने बंद दाराआड चर्चा करून महत्वपूर्ण राजनैतिक पुढाकार घेतला. 15 आणि 17 एप्रिल रोजी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या नेतृत्वाखाली दिल्लीत दोन्ही देशांची द्विपक्षीय बैठक झाली. विशेष म्हणजे या बैठकीत अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली.

एससीओचे राष्ट्रीय समन्वयक राजदूत आलोक ए. डिमरी यांनी भारताच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. राजदूत यान वेनबिन यांनी चीनच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, दोन्ही देशांमध्ये एससीओ नेत्यांच्या निर्णयांची अंमलबजावणी आणि संघटनेच्या भविष्यातील वाटचालीवर सविस्तर चर्चा झाली.

भारत आणि चीन एकाच मंचावर आल्याने हा मोठा धक्का अमेरिकेला म्हणावा लागेल. भारतावर ज्याप्रकारे टॅरिफ अमेरिकेने लावला, त्यानंतर चीनने थेटपणे अमेरिकेच्या विरोधात भूमिका घेतल्याचे बघायला मिळाले. त्यामध्येच आता दोन्ही देशांनी युद्धाच्या स्थितीबाबतही चर्चा केल्याची माहिती मिळत आहे. होर्मुज खाडीत अमेरिकेने चीनला मदत मागितली होती. मात्र, चीनने स्पष्टपणे नकार दिला.

Follow Us
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...