AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आंतरराष्ट्रीय बाजारातून भारतासाठी गुड न्यूज, रशिया आणि भारताची मैत्री कायम, थेट घोषणा..

इराण आणि अमेरिका युद्धात नुकताच अमेरिकेकडून अत्यंत मोठी घोषणा करण्यात आली. अमेरिकेच्या या निर्णयाने जगात आनंदाची वातावरण बघायला मिळत आहे. शिवाय जागतिक संकट कमी होण्याची शक्यता आहे. नुकताच याबाबत घोषणा करण्यात आली.

आंतरराष्ट्रीय बाजारातून भारतासाठी गुड न्यूज, रशिया आणि भारताची मैत्री कायम, थेट घोषणा..
Russia and india
| Updated on: Apr 18, 2026 | 8:16 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्धाला एक महिना उलडून गेला. मात्र, युद्ध काही थांबण्याचे नाव घेत नाही. उलट परिस्थिती अधिक तणावात बघायला मिळत आहे. इराणकडून मोठी घोषणा करण्यात आली. इराणने होर्मुज खाडी खुली करण्याबाबत घोषणा केली. आता पुन्हा एकदा जगासाठी इराणने होर्मुज खाडी खुली केली. होर्मुज खाडी बंद असल्याने जग संकटात होते. जागतिक बाजारात तेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ होताना दिसली. होर्मुज खाडी खुली करण्यात आल्यानंतर काही तासातच तेलाच्या किमती घसरल्याचे बघायला मिळाले. इराण आणि अमेरिका युद्धात अमेरिकेने इराण आणि रशियाच्या तेलावरील सर्व निर्बंध हटवण्याचा मोठा निर्णय घेतला. फक्त एक महिन्याकरिता हे निर्बंध हटवले होते. जागतिक बाजारात तेलाच्या वाढलेल्या किमती स्थिर ठेवण्यासाठी. त्यानंतर स्वत: अमेरिकेच्या ट्रेझरीने सांगितले होते की, इराण आणि अमेरिका यांच्या तेलावरील काढलेल्या निर्बंधांना मुदत वाढून देणार नाहीत.

ज्यानंतर जग तणावात आले. नक्की तेल कोणाकडून खरेदी करायचे, हा प्रश्न अनेक देशांपुढे होता. भारताने आपली भूमिका स्पष्ट ठेवली होती की, आम्ही रशियाकडून तेल खरेदी करणार. आता अमेरिकेने मोठा निर्णय घेत पुन्हा एकदा रशिया आणि इराण यांच्या तेलावरील निर्बंध काही दिवसांकरिता स्थगित केले आहेत. आता भारत रशियाकडून आरामात तेल खरेदी करू शकतो.

अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाने 17 एप्रिलपासून सूट देण्याबाबत एक नवीन अधिसूचना जारी करण्यात आली. ज्याअंतर्गत देशांना रशियन तेल आणि पेट्रोलियम उत्पादने खरेदी करण्याची परवानगी आहे. 16 मे पर्यंत ही परवानगी देण्यात आली. कोणत्याही प्रकारचे निर्बंध रशिया आणि इराणच्या तेलावर आता नसणार आहेत. अजूनही इराणसोबतच्या युद्धात तोडगा निघू शकला नाही, ज्यामुळे अमेरिकेकडून हा निर्णय घेण्यात आला.

जर मुदतवाढ दिली नाही तर वेगळे जागतिक संकट निर्माण होऊ शकते, यामुळे अमेरिकेने एक पाऊस मागे घेतल्याचे बघायला मिळत आहे. कुठे ना कुठे अमेरिका तेलाच्या मुद्दामुळे या युद्धात मागे पडताना दिसत आहे. जग ऊर्जेच्या समस्येने झगडत आहे, यावेळी जगाच्या मदतीला रशिया धावून आल्याचे बघायला मिळत आहे. भारतात मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाचा पुरवठा रशियाकडून केला जात आहे.

Follow Us
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...