Iran Israel War : इराण-इस्रायल युद्धादरम्यान भारतीयांच्या अडचणी वाढल्या ? मोठी सूचना जारी

इराण-इस्रायल युद्धामुळे जगभरात तणाव वाढला आहे. या संघर्षामुळे अनेक भारतीय नागरिक परदेशात अडकले असून कतारने हवाई क्षेत्र बंद केल्याने त्यांची मायदेशी परतण्याची वाट बिकट झाली आहे. कतारच्या LNG उत्पादन थांबवल्याने भारताच्या ऊर्जा पुरवठ्यावरही गंभीर परिणाम झाला आहे, ज्यामुळे देशांतर्गत उद्योगांना आणि नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सुरक्षा आणि आर्थिक स्थैर्याची चिंता वाढली आहे.

Iran Israel War : इराण-इस्रायल युद्धादरम्यान भारतीयांच्या अडचणी वाढल्या ? मोठी सूचना जारी
अनेक फ्लाइट्स कॅन्सल
| Updated on: Mar 05, 2026 | 9:14 AM

इराण- इस्रायल आणि अमेरिकेत सुरू असलेल्या युद्धामुळे अख्खं जग हादरलं आहे. या संघर्षाचा फटका फक्त या तीन देशांना बसत नसून जगातील अनेक देशांवरही त्याचा परिणाम होताना दिसत आहे. अमेरिकेचे तळ असलेल्या अनेक देशांतही इराणने हल्ला चढवत ते उद्ध्वस्त केले. आखाती देशांनाही याचा फटका बसला असून या युद्धामुळे भारतीयांच्या अडचणीही वाढताना दिसत आहेत. भारतातील अनेक नागरिक बाहेरच्या देशांत अडकून पडले असून युद्धजन्य स्थितीमुळे विमान उड्डाणांर मर्यादा आल्याने ते मायदेशी परतू शकत नाहीयेत.

इराणमध्ये सुरू असलेल्या संघर्षादरम्यान, कतारमधील दोहा येथील भारतीय दूतावासाने एक नवीन ॲडव्हायजरी जारी केली आहे. भारतीय दूतावासाने ट्विटरवर एक पोस्ट केली आहे. कतारचे हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होणारी उड्डाणे तात्पुरती स्थगित करण्यात येतील. कतार एअरवेज आणि इतर विमान कंपन्यांद्वारे चालवल्या जाणाऱ्या उड्डाणे देखील स्थगित करण्यात येतील, असं त्यात नमूद करण्यात आलं आहे.

तुमचा प्रवास पुन्हा शेड्यूल करण्यासाठी संबंधित विमान कंपन्यांशी संपर्क साधा, असा सल्लाही या ॲडव्हायजरीद्वारे देण्यात आला आहे. कतारमधील भारतीय नागरिक सुरक्षित आणि कुशल राहतील, यासाठी भारतीय दूतावासातील कर्मचारी हे, कतारी अधिकारी आणि समुदाय नेत्यांशी सोबत काम करत आहेत, असंही त्यात लिहीण्यात आलं आहे. त्यामुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना, आता मायदेशी परतण्यासाठी आणखी काही काळ वाट पहावी लागू शकते. त्यांची व कुटुंबियांची चिंता मात्र वाढल्याचे दिसत आहे.

 

इराण-इस्रायल युद्धाचे अपडेट्स

– इस्रायल इराणच्या बुकान शहरावर जोरदार बॉम्बहल्ला करत आहे, ज्यामुळे अनेक सरकारी इमारती उद्ध्वस्त होत आहेत.

– इराणवरील हल्ले रोखण्यासाठीचे विधेयक अमेरिकन सिनेटमध्ये फेटाळण्यात आले. अनेक कायदेकर्त्यांनी ट्रम्प यांना पाठिंबा दिला.

– संयुक्त राष्ट्रांनी बुधवारी सांगितले की 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च रोजी इराणवर झालेल्या हल्ल्याच्या पहिल्या दोन दिवसांत अंदाजे 1, 00, 000 लोक तेहरानमधून पळून गेले.

– होम फ्रंट कमांड गुरुवारी दुपारपासून युद्धाशी संबंधित काही निर्बंध शिथिल करेल, मर्यादित क्रियां परवानगी देईल आणि 50 लोकांपर्यंत सार्वजनिक मेळाव्याला परवानगी देईल, असे इस्रायली सैन्याने सांगितलं.

कतारने थांबवलं LNG उत्पादन

पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षादरम्यान कतारने त्यांच्या वीज प्रकल्पांवर झालेल्या हल्ल्यांनंतर द्रवीभूत नैसर्गिक वायूचे (LNG) उत्पादन थांबवले आहे. मात्र यामुळे भारतातील पुरवठ्यावर परिणाम झाला असून प्रमुख देशांतर्गत क्षेत्रांसाठी इंधन उपलब्धतेत संकट निर्माण झालं आहे. आपल्या गॅसच्या गरजांच्या मोठ्या भागासाठी भारत हा कतारसोबतच्या दीर्घकालीन एलएनजी करारांवर अवलंबून आहे. कतारमधून होणारी वाहतूक तात्पुरती थांबल्यामुळे औद्योगिक ग्राहक आणि शहरी गॅस वितरण (सीजीडी) कंपन्यांचा पुरवठा 40 टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे.

Follow Us