
सध्या सुरु असलेल्या इराण-इस्रायल युद्धाशी आमचा काही संबंध नाहीय असं डोनाल्ड ट्रम्प सांगत आहेत. इस्रायलने केलेल्या हल्ल्याशी आमचा संबंध नाही ही अमेरिकेची अधिकृत भूमिका आहे. आमचा संबंध नाही असं सांगताना डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला इशारा सुद्धा दिला आहे. “आमच्या कुठल्या तळावर हल्ला केला, तर पूर्ण शक्तीनिशी तुम्ही याआधी पाहिला नसेल इतका मोठा हल्ला करु” अशी धमकीच डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. असं असताना इराणने इस्रायलच्या तेल अवीव मधील अमेरिकी दूतावासावर हल्ला केलाय. दूतावासावर झालेल्या या हल्ल्यात इमारतीच्या एका भागाच मोठ नुकसान झालय. कोणीही यात जखमी झालेलं नाही. अमेरिका, इराण-इस्रायल युद्ध रोखण्यासाठी प्रयत्न करत असताना हा हल्ला झालाय.
असोसिएटेड प्रेसनुसार, इराणचा सतत इस्रायलवर मिसाइल हल्ला सुरु आहे. या दरम्यान एका इराणी मिसाइलने अमेरिकी दूतावासावर हल्ला केला. डोनाल्ड ट्रम्प यांनी आधीच इशारा दिलेला असताना इराणने ही चूक केलीय. ट्रम्प यांनी आता खरच इराणला उत्तर द्यायचं ठरवलं, तर त्याचं काही खरं नाही. कारण अमेरिकेचा हल्ला इराणला झेपणार नाही. अमेरिकेचे राजदूत माइक हुकाबी यांच्यानुसार या हल्ल्यात अमेरिकी वाणिज्य दूतावासाचा काही भाग तुटला. कोणाचा मृत्यू झालेला नाही किंवा कोणी जखमी नाही.
अमेरिकी बेस उडवण्यात आला
एकदिवस आधीच इराक येथील अमेरिकी बेस उडवण्यात आला. अमेरिकी बेसवर ड्रोन हल्ला करण्यात आला. या हल्ल्याची जबाबदारी थेट इराणने घेतली नाही. पण त्यांच्या प्रॉक्सी संघटनांचा यामध्ये सहभाग आहे. इराणने दोन दिवसांपूर्वी इस्रायल आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मारण्याची धमकी दिलेली. आम्ही इस्रायलच्या सहकाऱ्यांना सुद्धा सोडणार नाही असं इराणने म्हटलेलं.
अमेरिकी अधिकाऱ्यांना घाबरवून सोडलय
इराण आणि इस्रायलमध्ये सुरु असलेल्या मिसाइल वॉरने अमेरिकी अधिकाऱ्यांना घाबरवून सोडलय. तीन दिवसांपूर्वी तेल अवीववर जेव्हा इराणने हल्ला केला, त्यावेळी इस्रायलमधील अमेरिकी राजदूत हुकाबी यांना पाचवेळा आपल ठिकाण बदलावं लागलं. हुकाबी म्हणाले, ‘त्या रात्री आम्ही जिथे जायचो, तेव्हा हल्ल्याची भिती असायची’ इराणच्या रडारवर इस्रायलच तेल अवीव शहर आहे.