VIDEO| षडयंत्र की दुर्घटना! ओमानच्या आखातात ‘युद्ध’ सुरू? इराण नौसेनेचे सर्वात मोठे जहाज आगीनंतर बुडाले

इराणची अर्ध सरकारी वृत्तसंस्था फार्स आणि तस्निम यांनी ही माहिती दिली. खरग नावाच्या या जहाजाला वाचविण्याचा प्रयत्न केला गेला, पण ते बुडाले. Iran Navy Largest Ship Sunk

VIDEO| षडयंत्र की दुर्घटना! ओमानच्या आखातात 'युद्ध' सुरू? इराण नौसेनेचे सर्वात मोठे जहाज आगीनंतर बुडाले
Follow us
| Updated on: Jun 02, 2021 | 3:37 PM

इराणः Iran Navy Largest Ship Sunk After Fire : इराण नौसेनेचे सर्वात मोठे जहाज बुधवारी आग लागल्यानंतर बुडालेय. ओमानच्या आखाती देशातील या अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. इराणची अर्ध सरकारी वृत्तसंस्था फार्स आणि तस्निम यांनी ही माहिती दिली. खरग नावाच्या या जहाजाला वाचविण्याचा प्रयत्न केला गेला, पण ते बुडाले. (Iran Navy Largest Ship Sunk In Gul Of Oman After Fire)

खर्ग आयलँडच्या नावावर या जहाजाचे नाव

इराणचे मुख्य तेल टर्मिनल असलेल्या खर्ग आयलँडच्या नावावर या जहाजाचे नाव ठेवण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी अडीच वाजता या जहाजात आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी ती विझविण्याचा प्रयत्न केला. पण प्रयत्नांना यश आले नाही. हे जहाज इराणच्या जस्क (Jask)बंदराजवळ बुडाले. हे बंदर तेहरानपासून सुमारे 1270 किलोमीटर अंतरावर आहे. हा अपघात पर्शियन गल्फमधील अरुंद रस्ता होरमुझच्या सामुद्रधुनीजवळ झालाय.

सोशल मीडियावर फोटो व्हायरल

या जहाजाची छायाचित्रे सोशल मीडियावरही व्हायरल होत आहेत. यात जॅकेट घातलेले जहाजाचे चालक दल जहाजावरून पाण्यात उडी मारून पोहून जीव वाचविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेने त्याला ट्रेनिंग शिप म्हटले आहे. चित्र आणि व्हिडीओंमध्ये जहाजातून धूर येत असल्याचे दिसून येते.

अमेरिकेने अंतराळातून शोध घेतला

अमेरिकेच्या नॅशनल ओसियेनिक अँड एटमसफेरिक एडमिनिस्ट्रेशनने अंतराळातील उपग्रहाच्या माध्यमातून जहाजावरील आगीचा अंदाज घेण्यात आला होता. इराणी माध्यमांना हे कळविण्यापूर्वी त्यांनी याची माहिती दिली होती.

इराणची ताकद होते हे जहाज

हे जहाज इराणच्या नौदलाचे सामर्थ्य वाढवण्यास सक्षम होते. अवजड माल उचलण्यास सक्षम असलेल्या या जहाजातून हेलिकॉप्टरदेखील प्रक्षेपित केले जाऊ शकत होते. हे जहाज 1977 मध्ये यूकेमध्ये बांधले गेले होते आणि 1984 मध्ये नौदलात सामील झाले. यासाठी इराणला बरीच मेहनत घ्यावी लागली. सुमारे पाच वर्षे चर्चा झाल्यानंतर इराणला हे जहाज मिळाले. या आगीमागील कारणांबद्दल इराणकडून कोणतेही विधान आलेले नाही. वर्ष 2019 पासून ओमानच्या आखातामध्ये अशा प्रकारच्या संशयास्पद घटना घडत आहेत. अमेरिकन नौदलाने नंतर आरोप केला की, इराण त्यांच्या जहाजांना लक्ष्य करीत आहे.

संबंधित बातम्या

अमेरिकेनं 110 कोटी डॉलर्समध्ये इराणचे 20 लाख बॅरल कच्चे तेल विकले, UAEकडून जप्त केला टँकर

एक मासा जाळ्यात अडकला, मच्छीमार झटक्यात लखपती बनला, वाचा नेमकं काय घडलं?

Iran Navy Largest Ship Sunk In Gul Of Oman After Fire

Non Stop LIVE Update
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.