युद्धनाैकेवरील हल्ल्यानंतर इराणची पहिली सर्वात प्रतिक्रिया, थेट म्हटले, अमेरिका पश्चाताप झाल्याशिवाय..

इराण आणि अमेरिका युद्ध पेटलेले असतानाच अमेरिकेने असा एक हल्ला केला की, ज्याने जगाची झोपच उडाली. थेट इराणी युद्धनाैकेवर हल्ला करण्यात आला. पूर्ण युद्धनाैका बुडवण्यात आली. या घटनेने खळबळ उडाली असताना आता इराणकडून मोठे विधान करण्यात आले.

युद्धनाैकेवरील हल्ल्यानंतर इराणची पहिली सर्वात प्रतिक्रिया, थेट म्हटले, अमेरिका पश्चाताप झाल्याशिवाय..
Iran warship attack
| Updated on: Mar 05, 2026 | 2:07 PM

इराण, अमेरिका आणि इस्त्रायल यांच्यातील संघर्ष सध्याच्या घडीला टोकाला पोहोचला आहे. त्यामध्येच भारतातून इराणच्या दिशेने निघालेल्या युद्धनाैकेवर अमेरिकेने मोठा हल्ला केला. या युद्धनाैकेवर 180 इराणी सैनिक होते. त्यापैकी 87 जणांचा मृत्यु झाला तर कित्येक सैनिक बेपत्ता आहेत. विशाखापट्टनममध्ये ही इराणी युद्धनाैका युद्ध सरावाकरिता आली होती. फक्त इराणी नाैकाच नाही तर अनेक देश या सरावात सहभागी झाले होते. इराणच्या दिशेने श्रीलंकेच्या समुद्र हद्दीत हल्ला करण्यात आला आणि इराणी युद्धनाैका बुडवण्यात आली. या घटनेने खळबळ उडाली. अमेरिकेने मान्यही केले की, आम्हीच इराणच्या युद्धनाैकेवर हल्ला केला. युद्धनाैकेवर करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर इराणचा थयथयाट बघायला मिळत आहे. या युद्धनाैकेवरील हल्ल्यानंतर अमेरिकेने म्हटले की,आम्ही इराणवर लष्करी कारवाई करण्यासाठी आता मुक्त आहोत.

इराणची ही युद्धनाैका भारतात पाहुणे म्हणून युद्ध सरावाकरिता दाखल झाली होती. मात्र, परतीच्या प्रवासामध्ये घात झाला. यावर आता इराणकडून पहिली अत्यंत मोठी प्रतिक्रिया आली आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अरघची यांनी थेट म्हटले की, आंतरराष्ट्रीय समुद्रात इराणी जहाजावर हल्ला करणे हा समुद्रातील अत्यंत मोठा गुन्हा आहे.

परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अरघची यांनी पुढे बोलताना म्हटले की, ही युद्धनाैका नुकताच झालेल्या भारतीय नाैदलाच्या कार्यक्रमातून परतत होती, त्यावेळी हल्ला करण्यात आला. या कृतीचा अमेरिकेला अत्यंत गंभीर परिणाम भोगावा लागेल, त्यांना पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही असे थेट इशारा देत त्यांनी म्हटले. इराणच्या या युद्धनाैकेला फ्रिगेट आयआरआयएस देनाला टॉर्पेडोने धडक दिली.

श्रीलंकेच्या दक्षिण किनाऱ्याजवळ हिंद महासागरात हा हल्ला झाला. हे जहाज भारतात संयुक्त नौदल सरावातून परतत होते. आता इराण या हल्ल्याचा नक्की कसा बदला घेणार हे पाहण्यासारखे ठरणार आहे. कारण इराणने स्वप्नातही विचार केला नव्हता की, अशाप्रकारचा कोणता हल्ला हा अमेरिकेकडून केला जाईल. अमेरिकेच्या या हल्ल्यामुळे युद्ध अधिक चिघळण्याची शक्यता वर्तवली जात असल्याचे दिसत आहे.

Follow Us