AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युद्धाच्या 100 तासानंतर इराणची जगाला हादरवणारी धमकी, 9 देशांमध्ये तब्बल…

अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष टोकाला पोहोचला असून या युद्धाच्या झळा फक्त तीन देशांपुरत्या मर्यादित राहिल्या नाहीत. जगातील जवळपास सर्वच देशांना या युद्धाचा फटका बसत आहे. त्यामध्येच इराणकडून मोठी देण्यात आली.

युद्धाच्या 100 तासानंतर इराणची जगाला हादरवणारी धमकी, 9 देशांमध्ये तब्बल...
Iran-America war
| Updated on: Mar 05, 2026 | 1:30 PM
Share

अमेरिका इराण यांच्यातील तणावाच्या स्थितीमध्ये अनेक धक्कादायक निर्णय घेतले जात आहेत. इस्त्रायल आणि अमेरिकेकडून इराणवर मोठे हल्ले केले जात आहेत. इराणच्या प्रमुख शहरातील इमारतींना मोठे नुकसान पोहोचवण्यात आले. या युद्धात इराणच्या हातून बरेच काही जाताना दिसत आहे. लोक थेट रस्त्यावर उतरून अमेरिका आणि इस्त्रायलचा निषेध करत आहेत. इराणमध्ये मुलींच्या शाळेंवर मोठा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात एकाच शाळेतील 170 मुलींचा जीव गेला. यानंतर अमेरिकेने थेट भारताच्या विशाखापट्टनम येथून इराणच्या दिशेने रवाना झालेल्या इराणी युद्धनाैकेवर हल्ला केला. ज्यामध्ये 87 इराणी सैनिक मारले गेले. अमेरिकेने परमाणू चाचणी केल्याचाही दावा केला जात आहे. अनेक देशांनी या युद्धात तटस्थ भूमिका घेतली तर काही देश थेट अमेरिकेच्या बाजूने उभे आहेत. भारताकडून हे युद्ध थांबवण्याकरिता प्रयत्न केली जात आहेत.

अमेरिकेसोबतच्या युद्धाला 100 तास पूर्ण झाल्यानंतर इराणकडून पहिल्यांदा मोठी धमकी देण्यात आली. थेट इस्त्रायलच्या परमाणू ठिकाणांवर हल्ला करण्याची चेतावणी इराणकडून देण्यात आली. इराणने आतापर्यंत 9 देशातील 13 अमेरिकन तळांवर हल्ला केला. यासोबतच अमेरिकन दूतावाला देखील हल्ल्यात टार्गेट केले जात आहे.

इराणमधील मृतांचा आकडा 1,045 वर पोहोचला आहे. लेबनॉनमध्ये 60 हून अधिक आणि इस्रायलमध्ये 11 लोकांचा मृत्यू झाला आहे. या युद्धात उतरल्यानंतर अमेरिकेलाही मोठ्या झळा बसत आहेत. अमेरिकेचे 6 सैनिक या युद्धात गेली. इराणचे सर्वाेच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनानंतर शोकसभा आयोजित करण्यात येणार होती.

मात्र, अमेरिकेने ज्याप्रकारे इराणी युद्धनाैकेवर हल्ला केला, त्यानंतर याला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला. या हल्ल्यांमुळे इराणच्या हवाई संरक्षण प्रणाली आणि ड्रोन तळांना मोठे झाले. मध्य पूर्वेत लाखो प्रवासी अडकले आहेत. आंतरराष्ट्रीय शिपिंग पूर्णपणे कोलमडले आहे. यासोबतच अनेक देशांमध्ये फळे, भाजीपाल्याची अजिबात निर्यात किंवा आयात होत नाहीये.

या युद्धाचा सर्वात मोठा परिणाम हा थेट तेलाच्या किंमतींवर झाला आहे. जागतिक अर्थव्यवस्थेला मोठे नुकसान पोहोचवू शकते. जगभरातील शेअर बाजार कोसळत आहेत. तेहरानमधील सरकारी टेलिव्हिजनने हल्ल्यात उद्ध्वस्त झाले. सरकारी इमारतींचे मोठे नुकसान झाले. अमेरिकेचे कोट्यावधीचे फायटर जेट पडली आहेत. इस्त्रायलमध्येही मोठे नुकसान झाले. फक्त इस्त्रायल आणि इराणच नाही तर अमेरिकेच्या लष्करी तळांचेही मोठे नुकसान झाले जे 9 देशात होते.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...