अमेरिकेविरोधात इराणचा मोठा खेळ, थेट नागरिकांनाच केले आव्हान, उडाली खळबळ..

इराण आणि अमेरिका युद्ध सुरू आहे. या युद्धात अमेरिकेचे लढाऊ विमान कोसळले आहे. हा मोठा धक्का अमेरिकेला म्हणावा लागत आहे. अमेरिकेकडूनही बचावकार्य राबवले जात आहे. यादरम्यानच आता मोठी बातमी पुढे येत आहे.

अमेरिकेविरोधात इराणचा मोठा खेळ, थेट नागरिकांनाच केले आव्हान, उडाली खळबळ..
Iran US war
| Updated on: Apr 04, 2026 | 9:14 AM

इराण आणि अमेरिका युद्ध भडकले आहे. या युद्धात अमेरिकेकडून मोठे बॉम्ब हल्ले इराणवर केले जात आहेत. टार्गेट करून हल्ले होत आहेत. मात्र, या युद्धात अमेरिकेचे लढाऊ विमाने पाडली जात आहेत. शुक्रवारी इराणमध्ये अमेरिकेचे F-15 E लढाऊविमान कोसळले. मिळालेल्या माहितीनुसार, या विमानात 1 पायलट आणि 1 मागच्या सीटवरील शस्त्र प्रमाली अधिकारी होता. यापैकी एका सैनिकाला अमेरिकेच्या विशेष दलाने आधीच वाचवले. Axios आणि CBS News ने दिलेल्या वृत्तानुसार, दुसऱ्या क्रू सदस्याचा शोध सुरू आहे. तो अमेरिकेला मिळाला नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनीही म्हटले होते की, या लढाऊ विमानाच्या अपघाताबद्दल आणि बचावकार्याबद्दल मी जास्त माहिती देऊ शकत नाही. अमेरिकेकडून त्यांच्या सैनिकाला शोधण्याकरिता बचावकार्य राबवले जात असल्याची माहिती मिळत आहे. इराणच्या जबड्यातून त्यांना आपल्या सैनिकाला काढायचे आहे.

यादरम्यानच इराणी टीव्ही चॅनल्सनी थेटपणे जाहीर केले की, अमेरिकन पायलट किंवा संबंधित अधिकाऱ्याला जो कोणी पोलिस किंवा लष्कराकडे देईल, त्याला मोठे बक्षिस दिले जाईल. चॅनलने सांगितले की, आज ज्या अमेरिकन पायलटला खाली पाडण्यात आले त्याची शोधमोहिम सशस्त्र दलाकडून सुरू आहे. कोहगिलुई आणि बुएर-अहमद प्रांतातील  नागरिकांनो, जर तुम्ही शत्रू पायलट किंवा अमेरिकेचा अधिकारी दिसला तर त्याला पकडून पोलिस किंवा सैन्याच्या ताब्यात द्या.

जर तुम्ही असे केले तर तुम्हाला मोठे बक्षिस मिळेल. कोहगिलुयेह आणि बोयेर-अहमद प्रांत हा एक अतिशय डोंगराळ भाग आहे. इराणी अधिकाऱ्यांनी शेजारील चहारमहल आणि बख्तियारी प्रांतांमध्येही शोधमोहीम राबवण्याचे आवाहन केले आहे. ज्या भागात अमेरिकेचे लढाऊ विमान कोसळले, तिकडे मोठ्या संख्येने नागरिकांनी धाव घेतल्याची माहिती आहे.

इराणकडून अमेरिकेच्या संबंधित पायलट आणि अधिकाऱ्याचा शोध घेतला जात आहे. नक्की पायलट इराणमध्ये अडकला की अधिकारी याबाबत माहिती मिळू शकली नाही. अमेरिकेकडूनही बचावकार्य राबवले जात आहे. इराणमधून आपल्या अधिकारी किंवा पायलटला सुरक्षित अमेरिका काढणार का? हे काही वेळातच स्पष्ट होईल. इराणकडून थेट मोठी चेतावणी दिली गेली आहे.

Follow Us