डोनाल्ड ट्रम्प यांचे खळबळजनक विधान, थेट म्हणाले, इराणची जनता अत्यंत…

US Israel Iran War : अमेरिका आणि इराण युद्ध घातक स्थितीत आहे. मोठे हल्ले केले जात आहेत. जगातील इतर देशांनी या युद्धात सध्याच्या परिस्थितीला बघ्याची भूमिका घेतली. अमेरिका अधिक घातक बनली असताना नुकताच डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठे विधान केले.

डोनाल्ड ट्रम्प यांचे खळबळजनक विधान, थेट म्हणाले, इराणची जनता अत्यंत...
US President Donald Trump
| Updated on: Apr 03, 2026 | 1:17 PM

इराण आणि अमेरिका युद्ध पेटले आहे. अमेरिकेकडून मोठे हल्ले केले जात आहेत. युद्ध भडकणार आहे. इराणचा महत्वपूर्ण पूल अमेरिकेकडून पाठण्यात आला. कोणत्याही परिस्थितीमध्ये युद्ध थांबले पाहिजे, अशी मागणी जगाकडून केली जात आहे. कारण विनाशाला सुरूवात झाल्याचे दिसत आहे. इराणने युद्ध थांबवण्याकरिता प्रमुख मागण्या ठेवल्या आहेत. अमेरिकेने आम्ही विजयाच्या अत्यंत जवळ असल्याचे म्हटले. पण नक्कीच त्यांच्याकरिता हा विजय त्यांना वाटतो इतका सोप्पा नाही. इराणवर मोठे हल्ले अमेरिकेकडून केले जात आहेत. यादरम्यानच डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत धक्कादायक विधान केले. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, मी इराणी लोकांचा सन्मान करतो. ते खूप जास्त शक्तीशाली आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांचे हे विधान अशावेळी आहे, ज्यावेळी इराणवर असंख्य क्षेपणास्त्र अमेरिककडून टाकली जात आहेत. महत्वाच्या ठिकाणांना टार्गेट करून हल्ले केले जात आहेत.

टाइम मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीत बोलताना नुकताच डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, इराणी लोक खूप जास्त शक्तीशाली आहेत आणि वाईट काळ सहन करण्याची त्यांच्या क्षमता आहे. मी त्यांचा सन्मान करतो. इराणी लोक लढाऊ नाहीत, ते चांगले बोलतात. यादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी हे देखील सांगितले की, इराणसोबत बोलण्याची आता योग्य वेळ आली आहे.

लवकरात लवकर इराणसोबत युद्ध करार करू इच्छितात. इस्त्रायलबद्दल बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, इस्त्रायल एक संघातील चांगला खेळाडू आहे. बेंजामिन नेतान्याहू यांच्या नेतृत्वाखालील तेल अवीवमधील सत्ताकेंद्र, त्यांनी संघर्ष संपवण्याचा निर्णय घेताच त्यांच्या आदेशांचे पालन करेल, त्यासोबतच कारवाई थांबवेल, असा विश्वास डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या या मुलाखतीवरून स्पष्ट दिसत आहे की, त्यांना कोणत्याही पद्धतीने सध्याच्या घडीला युद्ध थांबवायचे आहे. कालच डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, इराणवरील हल्ले अधिक वाढू. त्यामध्येच आता मोठे हल्ले सुरू आहेत. फक्त इस्त्रायल आणि अमेरिकाच हल्ले करत आहेत, असे अजिबात नाही. इराणकडूनही मोठे हल्ले केले जात आहेत.

Follow Us