AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

समुद्रात झाला भारताविरोधात मोठा खेळ, भारताच्या दिशेने निघालेल्या इराणी तेलवाहू जहाजाचा यू-टर्न, थेट चीनच्या..

इराण आणि अमेरिका युद्धात तेलाची मोठी समस्या आहे. यादरम्यानच इराणही भारताच्या मदतीला धावून आला. इराणहून नुकताच भारताच्या दिशेने तेलवाहू जहाज निघाले. पण होर्मुज खाडी ओलांडल्यानंतर भारतासोबत मोठा गेम झाला.

समुद्रात झाला भारताविरोधात मोठा खेळ, भारताच्या दिशेने निघालेल्या इराणी तेलवाहू जहाजाचा यू-टर्न, थेट चीनच्या..
Iranian oil tanker
| Updated on: Apr 03, 2026 | 12:44 PM
Share

इराण आणि अमेरिका युद्ध भडकले आहे. या युद्धात जग वेगळ्या संकटात सापडले आहे. ऊर्जेचे मोठे संकट आहे. होर्मुज खाडी इराणकडून बंद करण्यात आली. ऊर्जेचे संकट कमी करण्याकरिता अमेरिकेने रशिया आणि इराणच्या तेलावरील निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला. अनेक वर्षांपासून अमेरिकेने इराणच्या तेलावर काही निर्बंध लादले. या युद्धाच्या स्थितीत त्यांनी निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला. इराण आणि अमेरिका युद्ध एका घातक टप्प्यात पोहोचले आहे. भारत तब्बल 7 वर्षानंतर इराणकडून तेल खरेदी करत आहे. अमेरिकेने लादलेल्या निर्बधामुळे भारताने इराणकडून तेल खरेदी थांबवली होती. मात्र, नुकताच समुद्रात धक्कादायक घटना घडली. हा घटनेने खळबळ उडाली. इराणहून भारताकडे तेल घेऊन निघालेले जहाज अचानक समुद्रात फिरवण्यात आले. या जहाजाने चीनच्या दिशेने मोठा युटर्न घेतला. या इराणी जहाजाने अचानकपणे रस्ता बदलल्याने खळबळ उडाली. सात वर्षाने इराणहून भारतात तेलवाहू जहाज दाखल होत असताना हा घटना घडली.

इराणी तेलवाहू जहाज जर भारतात पोहोचले असते तर सात वर्षांमध्ये पहिल्याच इराणी जहाज भारतात दाखल झाले असते. जहाज ट्रॅकिंग फर्म केप्लरच्या माहितीनुसार, तेल वाहून नेणाऱ्या इराणी जहाजाचे नाव पिंग शुन आहे. हे जहाज इराणहून भारताच्या दिशेने तेल घेऊन निघाले होते. सर्वकाही व्यवस्थित होते. हे जहाज अफ्रामॅक्स 2002 मध्ये निर्मित केले.

भारताच्या दिशेने निघालेले हे जहाज चीनच्या डोंगयिंगच्या दिशेने अचानकपणे वळवण्यात आले. याच आठवड्यात हे जहाज भारताच्या पश्चिम किनाऱ्यापट्टीवरील वादिनार येथे येणार होते. पेमेंट, वाहतूक आणि विमा यांच्याशी संबंधित काही समस्या असल्यामुळे हे जहाज भारतात न दाखल होता थेट चीनकडे रवाना करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

भारतात सध्या एलपीजी गॅसच्या तुटवडा आहे. भारत कोणत्याही पद्धतीने कच्चे ते आणि एलपीजी गॅस कसा दाखल होईल, याकरिता प्रयत्न करत आहे. यादरम्यान रशियाप्रमाणेच भारताच्या मदतीला इराणही धावून आल्याचे बघायला मिळाले. मात्र, काही तांत्रिक गोष्टीमुळे इराणहून भारताच्या दिशेने निघालेल्या जहाजाचा अचानक मार्ग बदलण्यात आला.

Follow Us
वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा
मोठी बातमी! वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा आक्रोश
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण! "काका मला मारू नका, मी...
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण!
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा Video समोर
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिय
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिया सुळेंनी पक्षातील Inside Story सांगितलीच
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले..
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले...
थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
मोठी बातमी! थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान
राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
Bachchu Kadu | राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर
Pandharpur Wari | टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर दिवेघाट सर करत वारी चालली पंढरी
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं,
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं, कोण आहे पवार कुटुंबातील होणारी सून?