किती देश युद्धात उतरल्यानंतर महायुद्ध मानले जाईल? सर्वात महत्त्वाची अट काय?

World War Criteria: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ले केले आहेत. इराणनेही याला उत्तर देताना अनेक देशांवर हल्ले केले आहेत. त्यामुळे आता जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचल्याचे बोलले जात आहे.

किती देश युद्धात उतरल्यानंतर महायुद्ध मानले जाईल? सर्वात महत्त्वाची अट काय?
World War Criteria
Image Credit source: Google
| Updated on: Mar 01, 2026 | 9:57 PM

मध्य पूर्वेत युद्धाला सुरुवात झाली आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ले केले आहेत. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ले होत आहेत. अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचे निधन झाले आहे. आता इराणने दुबई, बहरीन, कुवेत आणि कतारसह अनेक देशांवर क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत. त्यामुळे आता आगामी काळात इतरही अनेक देश या युद्धात सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेकांनी तिसऱ्या महायुद्धाला सुरुवात होणार अशी अटकळ बांधली आहे. आज आपण किती देश युद्धात उतरल्यानंतर महायुद्ध सुरू होते याबाबत माहिती जाणून घेऊयात.

एखादे युद्ध महायुद्ध कधी बनते?

एखाद्या युद्धाला महायुद्ध घोषित करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा खास मापदंड नाही. इतिहासकार आणि लष्करी तज्ञ वेगवेगळ्या निकषांवरून महायुद्धाची व्याख्या करतात. याचाच अर्थ महायुद्ध घोषित करण्यासाठी युद्धात सहभागी असलेल्या देशांची संख्या विचारात घेतली जात नाही. महायुद्ध हा शब्द ऐतिहासिक आहे, तो कायदेशीर नाही. जेव्हा एखाद्या युद्धात प्रमुख जागतिक शक्तींचा समावेश होतो, तेव्हा ते महायुद्ध म्हटले जाऊ शकते. जर एखाद्या युद्धात डझनभर देशांचा समावेश आहेस मात्र ते भौगोलिकदृष्ट्या मर्यादित असेल तर ते प्रादेशिक युद्ध म्हटले जाते. मात्र एखाद्या युद्धात जर मोठ्या महासत्ता आणि खंडांचा समावेश असेल तर कमी देशांचा सहभाग असलेले युद्धही महायुद्ध म्हटले जाऊ शकते.

महायुद्धाची प्रमुख अट काय आहे?

महायुद्धाची एक महत्त्वाची अट म्हणजे अमेरिका, रशिया आणि चीन सारख्या प्रमुख जागतिक शक्ती आणि नाटो सारख्या प्रमुख लष्करी ताकदीने जर थेट युद्धात सहभाग घेतला तर ते महायुद्ध म्हटले जाऊ शकते. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात महत्त्वपूर्ण लष्करी शक्ती असलेल्या शक्तिशाली देशांनी थेट संघर्षात भाग घेतला होता. यानंतर हा संघर्ष संघर्ष जगभर पसरला, ज्यामुळे महायुद्धाला सुरूवात झाली.

महायुद्धाची आणखी एक परिभाषा म्हणजे भौगोलिक प्रमाण. युद्ध जर एकाच प्रदेशाच्या पलीकडे सुरू झाला आणि त्यात अनेक खंड, समुद्री मार्ग आणि हवाई क्षेत्र समाविष्ट झाले तर ते महायुद्ध म्हटले जाते. पहिल्या महायुद्धात युरोप, आफ्रिका आणि मध्य पूर्वेमध्ये लढाया झाल्या होत्या. दुसऱ्या महायुद्धात युरोप, आशिया, आफ्रिका आणि पॅसिफिकपर्यंत संघर्ष पोहोचला होता.

 

Follow Us