AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इस्त्राइलने थेट सैन्य घुसवलं, या देशातील महत्त्वाचा प्रदेश जिंकून फडकवला झेंडा; आता महाभयंकर युद्ध?

Israel Lebanon War : इस्त्राईलच्या सैन्याने दक्षिण लेबनानमधील रणनीतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या टेकडीवर कब्जा मिळवला आहे. या टेकडीच्या शिखरावरील ऐतिहासिक ब्यूफोर्ट किल्ल्यावर इस्त्राईलने आपला झेंडा फडकवला आहे.

इस्त्राइलने थेट सैन्य घुसवलं, या देशातील महत्त्वाचा प्रदेश जिंकून फडकवला झेंडा; आता महाभयंकर युद्ध?
israel army captures beaufort castleImage Credit source: Google
| Updated on: May 31, 2026 | 4:20 PM
Share

संपूर्ण जगाचे लक्ष वेधणारी बातमी समोर आली आहे. इस्त्राईलच्या सैन्याने दक्षिण लेबनानमधील रणनीतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या टेकडीवर कब्जा मिळवला आहे. या टेकडीच्या शिखरावर ऐतिहासिक ब्यूफोर्ट किल्ला आहे, याच किल्ल्यावर 44 वर्षांनंतर पुन्हा एकदा इस्त्राईलचा झेंडा फडकवण्यात आला आहे. गेल्या 26 वर्षांतील लेबनानमध्ये इस्त्राईलच्या सैन्याने आतपर्यंत केलेला हा सर्वात मोठा कब्जा मानला जात आहे. याबाबतची माहिती रविवारी इस्त्राईलच्या सैन्याने दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

इस्त्राइलचा ब्यूफोर्ट किल्ल्यावर कब्जा

समोर आलेल्या माहितीनुसार, नबातियेह शहराजवळील ब्यूफोर्ट किल्ल्यावर कब्जा मिळवण्यासाठी इस्त्राईलच्या सैन्याने आसपासच्या गावांमध्ये अनेक दिवस हवाई हल्ले केले. या कारवाईदरम्यान दुर्गम भागात हिजबुल्लाच्या लढवय्यांसोबत तीव्र संघर्ष झाला. मार्चच्या सुरुवातीला इस्त्राईल आणि हिजबुल्लामध्ये नव्याने सुरू झालेल्या संघर्षानंतर ब्यूफोर्ट किल्ल्यावर कब्जा मिळवणे ही इस्त्राईलसाठी मोठी लष्करी कामगिरी मानली जात आहे. 17 एप्रिलपासून लागू असलेल्या संघर्षविरामानंतरही इस्त्राईलने ही कारवाई केली आहे.

इस्त्राईलच्या सैन्याचे प्रवक्ते अवीचाय अद्राई यांनी ‘एक्स’ वर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत इस्त्राईलचे सैनिक किल्ल्याबाहेर फिरताना दिसत आहेत. इस्त्राईलचे संरक्षण मंत्री इजरायल काट्झ यांनीही ‘एक्स’वर पोस्ट करत सैनिकांनी ब्यूफोर्ट किल्ल्यावर इस्त्राईलचा ध्वज फडकावल्याची माहिती दिली. यापूर्वी 1982 मध्येही इस्त्राईलच्या सैन्याने या किल्ल्यावर कब्जा मिळवला होता. त्यानंतर 2000 मध्ये लेबनानमधून माघार घेईपर्यंत हा किल्ला त्यांच्या ताब्यात होता.

इस्त्राइल आणखी आक्रमक होण्याची शक्यता

इस्त्राईलच्या सैन्याने जारी केलेल्या निवेदनानुसार, काही दिवसांपूर्वी ब्यूफोर्ट रिज आणि त्याच्या दक्षिणेकडील सुलुकी खोऱ्यात लष्करी मोहीम सुरू करण्यात आली होती. या मोहिमेचा उद्देश हिजबुल्लाच्या तळांचा नाश करणे आणि ‘इस्त्राईलच्या नागरिकांवरील थेट धोके दूर करणे’ हा होता. तसेच, गरज पडल्यास ही मोहीम आणखी विस्तारित करण्यास सैन्य तयार असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान, गेल्या काही काळात इस्त्राईलने लेबनानमधील लष्करी कारवाया वाढवल्या आहेत. लितानी नदी पार करून इस्त्राईलच्या सैन्याने दक्षिण लेबनानच्या अनेक भागांत प्रवेश केला असून, तेथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आता आगामी काळात इस्त्राईल काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange Hunger Strike | जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर...
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन, असं काय घडलं?
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत...
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत नेमकं काय घडलं?
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासक...
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासकांसोबत सविस्तर चर्चा
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
36 Jilhe 50 Batmya | 36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या;
36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या; मराठा आंदोलनासह राज्यात मोठ्या घडामोडी, जाणून घ्या एका क्लिकवर
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार- सुनेत्रा पवार
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार' सुप्रिया सुळेंचे नाव घेत सुनेत्रा पवार म्हणाल्या...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांची असणार मांदियाळी
ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानच्या २१व्या दहीहंडी उत्सवाची तयारी सरु
आमदार रवींद्र फाटक यांनी केली ठाण्यातील २१व्या संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी महोत्सवाची घोषणा
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा;
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा; हल्ल्याचा निषेध करत केली मोठी मागणी