Israel : सतत लढणाऱ्या, संघर्ष करणाऱ्या इस्रायलला मागच्या 24 तासात मिळाल्या 4 मोठ्या आनंदाच्या बातम्या
Israel : मागच्या दोन वर्षांपासून इस्रायल अनेक आघाड्यांवर युद्ध लढत आहे. आता इस्रायलला मागच्या 24 तासात चार आनंदाच्या बातम्या मिळाल्या आहेत. बेंजामिन नेतन्याहू यांनी खास पोस्ट केली आहे.

अमेरिका-इराणमध्ये अद्याप एकमत होत नसताना मागच्या 24 तासात इस्रायलला तीन आनंदाच्या बातम्या मिळाल्या आहेत. पहिली आनंदाची बातमी अब्राहम कराराबद्दलची आहे. अमेरिकेने कतर, पाकिस्तान आणि सौदी अरेबियाला सांगितलं आहे की, इराण युद्धानंतर तुम्ही यरूशलेमला मान्यता द्या आणि अब्राहम करारात सहभागी व्हा. दुसरी आनंदाची बातमी सोमालीलँडची आहे. इस्रायलने सोमालियाच्या एका भागाला सोमालीलँड म्हणून मान्यता दिली आहे. आता सोमालीलँड येरुशलेममध्ये दूतावास उघडणार आहे.
तिसरी आनंदाची बातमी शेजारच्या तुर्कीकडून मिळाली आहे. सायप्रस निवडणुकीत इस्रायल समर्थित डीवायएसआय पार्टीला मोठा विजय मिळाला आहे. ही सायप्रसमधली दक्षिणपंथी पार्टी आहे. पक्षाचे नेते खुल्या मंचावरुन इस्रायलच्या धोरणांच कौतुक करतात.
बेंजामिन नेतन्याहू यांची खास पोस्ट
इराण आणि अमेरिकेत कराराचा जो प्रस्ताव तयार झालाय, त्यानुसार इराण अणवस्त्र बनवणार नाही. त्याशिवाय इराणने अमेरिकेला शब्द दिलाय की, संवर्धित युरेनियम आम्ही संपवू. त्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी एक पोस्ट केली आहे.
म्हणून इस्रायल त्रस्त होता
नेतन्याहू यांनी स्वत:चा फोटो पोस्ट करत लिहिलय की, इराणकडे अणवस्त्र नसेल. मिडिल ईस्टमध्ये इस्रायलचा सर्वात मोठा शत्रू इराणच आहे. इराणच्या अन्य दहशतवादी संघटनांमुळे इस्रायल त्रस्त होता. इराणने इस्रायलच्या सभोवताली हे दहशतवादी संघटनांचं जाळं उभारलं होतं.
त्यावेळी फक्त UAE ने या करारावर स्वाक्षरी केलेली
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पहिल्या कार्यकाळात इस्रायलला मुस्लिम जगात प्रवेश मिळवून देण्यासाठी अब्राहम करार तयार केला होता. त्यावेळी फक्त UAE ने या करारावर स्वाक्षरी केली होती. आता सौदी अरेबिया, पाकिस्तान सारख्या देशांना यात सहभागी करुन घेण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे.
एक्सियोसनुसार ट्रम्प या देशांसोबत फोनवरुन बोलले आहेत. इराण युद्धानंतर इस्रायल सोबत सर्वांनी यावं. त्यासाठी अब्राहम करारावर स्वाक्षरी आवश्यक आहे असं ट्रम्प म्हणाले.
इस्रायलने या देशाला मान्यता दिली
इस्रायलच्या येरुशलेममध्ये सीमालीलँड आपलं दूतावास सुरु करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. सोमालीलँड सोमालियापासून स्वतंत्र होऊन तयार होणारा देश आहे. इस्रायलने या देशाला मान्यता दिली आहे. अनेक अरब देश याला विरोध करत आहेत.
मिडिल ईस्ट मध्ये इस्रायलची नजर सोमालीलँड आणि सायप्रस वर आहे. सायप्रस तुर्कीच्या शेजारी असलेला देश आहे. इस्रायल आणि तुर्कीमध्ये छत्तीसचा आकडा आहे.