भारताचा मोठा दणका, थेट मुस्लिम देशांना फटकारे, पाकिस्तानचे ऐकून जम्मू काश्मीरसह..
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध कायमच तणावात राहिली आहेत. त्यातच पाकिस्तानच्या मागून काट्या करण्याचे काही थांबत नाहीये. थेट OLC मध्ये भारताविरोधात भूमिका घेण्यात आली आणि थेट प्रस्तावही ठेवण्यात आला.

इराकच्या बगदादमध्ये 17-18 ऑक्टोबर 2026 रोजी इस्लामी सहयोग संघटनच्या विदेश मंत्र्यांची परिषद पार पडली. 52 व्या बैठकीत थेट भारताबद्दल प्रस्ताव ठेवण्यात आला. आता विरोधी प्रस्तावाबद्दल भारत सरकारने टीका करत त्यांनी ठेवलेला प्रस्ताव फेटाळून लावला. परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले की, OLC ला भारताच्या अंतर्गत मुद्द्यावर भाष्य करण्याचा कोणताही अधिकार नाही. मंत्रालयाने स्पष्ट केले की, OLC बैठकीत भारताबद्दल बोलणे हे अत्यंत दुर्देव आहे. पक्षपातीपणा आणि सर्वकाही खोटे आहे. या गोष्टींना पाकिस्तानकडून खतपाणी घालण्यात आले. विदेश मंत्रालयाने म्हटले की, 17-18 ऑक्टोबर 2026 ला बगदादमध्ये आयोजित OLC परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेतील बैठकीत भारताविरोधात प्रस्ताव आणले गेले. भारताने हे प्रस्ताव फेटाळून लावली. आम्ही या गोष्टीमुळे प्रचंड जास्त निराश आहोत की, OLC ने पुन्हा एकदा कट्टर एजेंड्यासाठी स्वत:चा वापर होऊ दिला.
विदेश मंत्रालयाने हे देखील स्पष्ट केले की, OLC पुन्हा एकदा कट्टरपंथीचे शिकार झाले. OLC हा मुस्लिम देशांची मोठी संघटना आहे. भारताने यादरम्यानच स्पष्ट केले की, केंद्र शासित प्रदेश जम्मू काश्मीर आणि लदाख हे भारताचे अभिन्न आणि अविभाज्य भाग आहेत. कोणत्याच गोष्टीमुळे हे सत्य बदलणार नाही.
चुकीच्या गोष्टी पसरवल्या गेल्या तरीही सत्य कोणत्यातच परिस्थितीमध्ये बदलणार नाही. वस्तूस्थिती जी आहे तीच स्वीकारावी लागणार आहे. भारताने आपला विरोध जाहीर केला. भारताबद्दल तिथे विरोधी भूमिका घेण्यात आली. भारताविरोधात प्रस्तावही आणण्यात आला. हा सर्व कट पाकिस्तानचा होता. पाकिस्तान सुरूवातीपासूनच भारताविरोधात भूमिका घेतो.
त्यातच भारताविरोधात काही मुस्लिम देशांना एकत्र घेताना पाकिस्तान दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानकडून मुस्लिम नाटोचाची घोषणा करण्यात आली, भारताने पाकिस्तानविरोधात ऑपरेशन सिंदूरमध्ये सपरू केला. ज्यानंतर पाकिस्तानला सळो की पळो करून सोडले. पाकिस्तान इतर मुस्लिम देशांचे पाय भारताविरोधात पकडताना दिसत आहे. पाकिस्तानतला हे चांगले कळून चुकले आहे की, भारतापुढे आता त्यांचे काहीच होऊ शकत नाही.