या प्राण्याच्या विष्ठेतून तयार होते जगातील सर्वात महागडी कॉफी, किंमत तब्बल 12 हजार रुपये किलो, लोक आवडीने पितात

जगातील सर्वात महागडी कॉफी, जी या प्राण्याच्या विष्ठेतून होते तयार. एक किलो कॉफीची किंमत तब्बल 12 हजार रुपये किलो. तरी देखील लोक आवडीने पितात. नाव ऐकूनच..

या प्राण्याच्या विष्ठेतून तयार होते जगातील सर्वात महागडी कॉफी, किंमत तब्बल 12 हजार रुपये किलो, लोक आवडीने पितात
Image Credit source: Social media
| Updated on: Oct 02, 2026 | 8:42 PM

सध्या चहाच्या दुकांमध्ये किंवा मोठ-मोठ्या ब्रँडच्या ठिकाणी वेगवेगळ्या कॉफी बघायला मिळतात. 1 ऑक्टोबर हा दिवस ‘वर्ल्ड कॉफी डे’ म्हणून ओळखला जातो. सकाळची सुरुवात असो किंवा दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठीचा ब्रेक, अनेकांसाठी गरमागरम कॉफी हा आवडीचा पर्याय असतो. मात्र, जगात अशी एक कॉफी आहे जिची किंमत ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. ‘सिवेट कॉफी’ किंवा ‘कोपी लुवाक’ म्हणून ओळखली जाणारी ही कॉफी भारतात साधारण 9 ते 12 हजार रुपये किलो दराने विकली जाते असं सांगितलं जातं.

सिवेट कॉफीच्या निर्मितीमागे एशियन पाम सिवेट या मांजरीसारख्या दिसणाऱ्या छोट्या वन्य प्राण्याची भूमिका असते. हा प्राणी इंडोनेशिया आणि दक्षिण-पूर्व आशियातील काही भागांमध्ये आढळतो. कॉफीच्या बागांमध्ये फिरताना सिवेट प्रामुख्याने पिकलेल्या कॉफी चेरीज खातो.

Loading...

या फळांमधील कॉफीच्या बिया मात्र सिवेटच्या पचनसंस्थेत पूर्णपणे पचत नाहीत. पचनाच्या प्रक्रियेदरम्यान त्यांच्यावर एन्झाइम्स आणि आम्लांचा परिणाम होतो. त्यामुळे बियांमध्ये नैसर्गिक फर्मेंटेशनची प्रक्रिया घडते. या प्रक्रियेमुळे कॉफीच्या चवीत बदल होऊन ती तुलनेने मऊ आणि वेगळी लागते, असा दावा केला जातो.

यानंतर सिवेटच्या विष्ठेतून कॉफीच्या बिया गोळा केल्या जातात. या बिया स्वच्छ धुऊन, वाळवून आणि भाजल्यानंतर त्यापासून कॉफी तयार केली जाते. ही प्रक्रिया वेळखाऊ आणि मर्यादित उत्पादनाची असल्यामुळे सिवेट कॉफीची किंमत अधिक असल्याचं सांगितलं जातं.

प्राण्यांच्या क्रूरतेचा मुद्दाही चर्चेत

सिवेट कॉफीच्या लोकप्रियतेसोबतच तिच्या निर्मितीतील प्राण्यांच्या कल्याणाचा मुद्दाही महत्त्वाचा आहे. अधिक नफा मिळवण्यासाठी काही ठिकाणी सिवेट प्राण्यांना पिंजऱ्यात ठेवून त्यांच्याकडून कॉफीच्या बिया मिळवल्या जात असल्याच्या तक्रारी आहेत.

त्यामुळे सिवेट कॉफी खरेदी करताना ती जंगलातून नैसर्गिक आणि प्राण्यांना इजा न पोहोचवता मिळवलेली आहे का, याची माहिती घेणं महत्त्वाचं मानलं जातं. एका कपामागची ही अनोखी प्रक्रिया आणि त्याची किंमत यामुळे सिवेट कॉफी जगातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या महागड्या कॉफींपैकी एक ठरली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us