आता ट्रम्प यांच्यापुढे फक्त दोनच मार्ग…, इराणची अमेरिकेला हादरवणारी धमकी, जगभरात मोठी खळबळ
मोठी बातमी समोर येत आहे, इराणकडून अमेरिकेला पुन्हा एकदा मोठी धमकी देण्यात आली आहे. या धमकीमुळे मोठी खळबळ उडाली आहे. आता अमेरिकेपुढे दोनच पर्याय असल्याचं इराणने म्हटलं आहे.

अमेरिका आणि इराणमध्ये जरी युद्धविराम झाला असला तरी देखील अजूनही संघर्ष कायम असल्याचं पहायला मिळत आहे. एकीकडे इराणने आपल्यासोबत अणु करार करावा यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणवर दबाव निर्माण करण्याचं काम सुरू आहे. तर दुसरीकडे आता इराणकडून देखील अमेरिकेला थेट धमकी देण्यात आली आहे. इराणची ताकद आणि निश्चयाचं चुकीचं आकलन आमच्या शत्रुंनी केलं आहे, असं इराणच्या इस्लामिक रेवोल्यूशन गार्ड्स कॉर्प्स (IRGC) चे वरिष्ठ अधिकारी यादोल्लाह जावानी यांनी म्हटलं आहे. आमच्यावर एवढा दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला, आमच्यापुढे मोठी आव्हानं निर्माण केली गेली, मात्र तरी देखील आम्ही आता पूर्वीपेक्षाही जास्त मजबूत झालो आहोत. मात्र दुसरीकडे या युद्धात अमेरिकेचं प्रचंड नुकसान झालं आहे, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
इस्लामिक रिपब्लिक न्यूज एजन्सी ( IRNA) ला बोलताना यादोल्लाह जावानी यांनी म्हटलं आहे की, आमच्या ताकदीचा चुकीचा अंदाज आमच्या शत्रूंनी लावला आहे. मात्र इराण पुर्वीपेक्षा आता अधिक मजबूत झालं आहे. मात्र आमचे शत्रू कमजोर झाले आहेत. आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापुढे फक्त दोनच मार्ग आहेत, वाईट रस्ता आणि सर्वात वाईट रस्ता. आता अमेरिकेला फक्त एवढाच निर्णय घ्यायचा आहे, तो म्हणजे इराणनी जनतेचे अधिकार आणि त्यांच्या अटी स्विकार करायच्या आहेत की, युद्ध सुरूच ठेवायचं आहे? अशी थेट धमकीच आता इराणकडून अमेरिकेला देण्यात आली आहे.
28 फेब्रुवारी रोजी इस्त्रायलकडून इराणवर पहिला हल्ला करण्यात आला होता, त्यानंतर भीषण युद्धाला सुरुवात झाली, त्यानंतर या युद्धात अमेरिकेनं देखील उडी घेतली. अमेरिका आणि इस्त्रायलकडून करण्यात आलेल्या हल्ल्यांमध्ये इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे. इराणचे अनेक टॉप कमांडर या युद्धात मारले गेले, मात्र दुसरीकडे इराणने देखील आपल्या मिसाईल हल्ल्यांनी अमेरिका आणि इस्त्रायलच्या नाकेनऊ आणले, या हल्ल्यात अमेरिका आणि इस्त्रायलचं देखील मोठं नुकसान झालं आहे.