होय, आम्ही 'जैश'ला भारतात हल्ले करायला लावले: मुशर्रफ

इस्लामाबाद: पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती जनरल परवेज मुशर्रफ यांनी गौप्यस्फोट केला आहे. आपल्या राष्ट्रपतीपदाच्या कार्यकाळात सरकारच्या सांगण्यावरुन जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अजहरने भारतात बॉम्बस्फोट केले होते, अशी कबुली मुशर्रफ यांनी दिली. पाकिस्तानी पत्रकार नदीम मलिकला टेलिफोन मुलाखतीत त्यांनी ही खळबळजनक माहिती दिली. शिवाय त्यांनी जैश ए मोहम्मदवरील कारवाई योग्य असल्याचं म्हटलं. याच …

होय, आम्ही 'जैश'ला भारतात हल्ले करायला लावले: मुशर्रफ

इस्लामाबाद: पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती जनरल परवेज मुशर्रफ यांनी गौप्यस्फोट केला आहे. आपल्या राष्ट्रपतीपदाच्या कार्यकाळात सरकारच्या सांगण्यावरुन जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अजहरने भारतात बॉम्बस्फोट केले होते, अशी कबुली मुशर्रफ यांनी दिली. पाकिस्तानी पत्रकार नदीम मलिकला टेलिफोन मुलाखतीत त्यांनी ही खळबळजनक माहिती दिली. शिवाय त्यांनी जैश ए मोहम्मदवरील कारवाई योग्य असल्याचं म्हटलं. याच संघटनेने माझ्या हत्येचाही प्रयत्न केला होता, असाही दावा मुशर्रफ यांनी केला.

मी नेहमीच जैश ए मोहम्मद या संघटनेला दहशतवादी संघटनाच संबोधत आलो आहे. त्यांनी माझ्यावरही हल्ला केला होता. त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. मला आनंद आहे की सरकार या संघटनेविरोधात कडक कारवाई करत आहे. पण ही कारवाई आधीच व्हायला हवी होती, असं मुशर्रफ म्हणाले.

डिसेंबर 2003 मध्ये पाकिस्तानमध्ये मुशर्रफ यांच्या ताफ्यावर जैश ए मोहम्मदने हल्ला केला होता. त्यावेळी त्यांनी जैशवर दोनवेळा बंदी आणण्याचा प्रयत्न केला होता.

आम्ही तिकडे स्फोट करत होतो

मुशर्रफ यांनी स्वत: बंदी का आणली नाही असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर मुशर्रफ म्हणाले, “त्यावेळी परिस्थिती ठिक नव्हती. त्यावेळी यामध्ये आमचे गुप्तचर आयएसआयवाले सहभागी होते, त्यावेळी भारत-पाकिस्तानमध्ये जशास तसं ही भूमिका घेतली जात होती. ते पाकिस्तानात स्फोट घडवत होते, आम्ही तिकडे करत होतो”

सध्या यूएईमध्ये वास्तव्य

परवेझ मुशर्रफ यांनी 1999 मध्ये सत्तापालट करुन पाकिस्तानची सूत्रं हाती घेतली होती. तत्कालिन पंतप्रधान नवाज शरीफ यांना बेदखल करुन ते राष्ट्रपती झाले होते. 9 वर्षे त्यांनी सत्ता उपभोगली. त्यानंतर ते यूएईला रवाना झाले, सध्या ते तिथेच राहतात.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *