किमान औषधं तरी पाठवा, महिन्याभरात पाकिस्तान वठणीवर

व्यापार बंद करुन एक महिनाही झाला नसताना पाकिस्तान सरकार वठणीवर आलंय. जीवनावश्यक औषधांचा तुटवडा (Indian Medicines Pakistan) जाणवल्यानंतर पाकिस्तानने भारतासोबत व्यापाराला अंशतः परवानगी दिली आहे.

किमान औषधं तरी पाठवा, महिन्याभरात पाकिस्तान वठणीवर

इस्लामाबाद : जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 काढल्यानंतर तिळपापड झालेल्या पाकिस्तानने भारतासोबतचे व्यापारिक संबंध तोडून टाकले. पण पाकिस्तानचं हे पाऊल त्यांनाच महागात (Indian Medicines Pakistan) पडताना दिसतंय. व्यापार बंद करुन एक महिनाही झाला नसताना पाकिस्तान सरकार वठणीवर आलंय. जीवनावश्यक औषधांचा तुटवडा (Indian Medicines Pakistan) जाणवल्यानंतर पाकिस्तानने भारतासोबत व्यापाराला अंशतः परवानगी दिली आहे.

पाकिस्तानकडून भारताला ताजी फळं, सिमेंट, खनिजे, तयार चामडे, पाकिट बंद खाद्य, अकार्बनिक रसायने, कच्चा कापूस, मसाले, रबर वस्तू, अल्कोहोल पेय, चिकित्सा उपकरण, समुद्री सामान, प्लास्टिक आणि क्रीडा साहित्य निर्यात केलं जात होतं. तर भारताकडून निर्यात केल्या जाणाऱ्या वस्तूंमध्ये जैव रसायने, कापूस, प्लास्टिकच्या वस्तू, धान्य, साखर, चहा, कॉफी, लोह, स्टीलच्या वस्तू, औषधं आणि तांबे यांचा समावेश होता.

पाकिस्तान औषधांची आयात करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भारतावर अवलंबून आहे. जीवनावश्यक औषधांपासून ते साप-कुत्रा चावल्यानंतर उपचारासाठी लागणारीही औषधंही भारतातूनच पाठवली जातात. पण भारताविरोधात काही तरी कारवाई करतोय हे दाखवण्यासाठी इम्रान खान सरकारने तातडीने सर्व संबंध तोडून टाकण्याची घोषणा केली, ज्या आता पाकिस्तानच्याच अंगाशी आल्याचं दिसतंय.

जुलैमधील एका अहवालानुसार, पाकिस्तानने 16 महिन्याच्या काळात भारताकडून 250 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या रेबीजरोधक आणि विषरोधक औषधांची खरेदी केली. भारत आणि पाकिस्तानमध्ये 2017-18 मध्ये केवळ 2.4 अब्ज डॉलरचाच व्यापार झाला, जो भारताचा उर्वरित जगाशी होणाऱ्या व्यापाराचा केवळ 0.31 टक्के आहे, तर पाकिस्तानच्या जागतिक व्यापाराचा 3.2 टक्के आहे. पाकिस्तानच्या एकूण द्वीपक्षीय व्यापारात भारताच्या निर्यातीत भारताचा हिस्सा 80 टक्के आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *