Pakistan : भारताच्या जवळच्या मित्राला फोडून समुद्रात कोंडी करण्याची पाकिस्तानची नवी चाल, त्यासाठी या मुस्लिम देशासोबत डील

Pakistan : पाकिस्तान एक-एक करुन भारताच्या जवळच्या मित्रांना फोडण्याचा प्रयत्न करत आहे. हे देश भारतापासून दूर गेले पाहिजेत ही पाकिस्तानची मानसिकता आहे. त्याच दृष्टीने पाकिस्तानने नवीन डाव टाकला आहे.

Pakistan : भारताच्या जवळच्या मित्राला फोडून समुद्रात कोंडी करण्याची पाकिस्तानची नवी चाल, त्यासाठी या मुस्लिम देशासोबत डील
Pakistan PM-Army Chief
| Updated on: Oct 21, 2026 | 10:39 PM

पाकिस्तानने भारताच्या अजून एका शेजाऱ्याला आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू इस्लामाबाद दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यात पाकिस्तान-मालदीवमध्ये अनेक मुद्यांवर एकमत झालं आहे. या दौऱ्यात पाकिस्तानने मालदीवसोबत सुमद्र सुरक्षा, संरक्षण सहकार्य, व्यापार, AI, पोलीस प्रशिक्षणासह अनेक मुद्यांवर करार केला आहे. या विविध कराराच्या माध्यमातून मालदीव-पाकिस्तान आपले संबंध अधिक दृढ बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. मोहम्मद मुइज्जू यांचा भारतविरोधी दृष्टीकोन सुरुवातीला होता. त्यात थोडा बदल झाला आहे. पण मालदीवसोबत पाकिस्तानची जवळीक वाढत चालली आहे.

भारताच्या शेजारी देशांना आपल्या बाजूला वळवण्याचा पाकिस्तानचा सतत प्रयत्न सुरु आहे. बांग्लादेश याचं उत्तम उदहारण आहे. शेख हसीना बांग्लादेशात सत्तेतून पायउतार झाल्यापासून पाकिस्तानचा हाच कार्यक्रम सुरु आहे. आता पाकिस्तान मालदीवसोबत आपले संबंध भक्कम बनवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच क्रमात मालदीवच्या राष्ट्रपतींनी पाकिस्तान दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये समुद्र सुरक्षा, संरक्षण सहाकार्यासारखे करार केले.

Loading...

काय-काय करार केलेत?

दक्षिण आशियातील देश जागतिक राजकारणाकडे नेहमीच भारत आणि त्या पुढचा विचार म्हणून पाहतात. याच आधारावर मालदीव पाकिस्तानसोबत पोलीस प्रशिक्षण आणि अन्य मुद्यांवर करार करुन संबंध बळकट करताना दिसतोय. सार्वजनिक सेवेतील अनेक महत्वपूर्ण क्षेत्र आरोग्य भर्ती, सिविल सेवा प्रशिक्षण, उच्च शिक्षण, हवाई संपर्क, वातवरण बदल, मत्स्य पालन विकास अशा बाबतीतही करार केले आहेत.

व्यापार किती मिलियन डॉलरपर्यंत नेण्याचा संकल्प?

इस्लामाबादमध्ये मुइज्जू आणि पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यात बैठक झाली. त्यावेळी ड्रग्स विरुद्ध लढाई, सायबर सुरक्षा, आर्टिफिशियल इंटेलिजेंस या संबंधीचे करार केले. त्याशिवाय आर्थिक विस्तार, नागरिक क्षेत्रात रणनितीक सहयोग आणि सुरक्षा करार करण्यात आले आहेत. पुढच्या दोन वर्षात द्विपक्षीय व्यापार 200 मिलियन डॉलर पर्यंत घेऊन जाण्याचा संकल्प सोडला आहे. कृषी उत्पादनं आणि आवश्यक खाद्य पदार्थांसाठी ‘ट्रेडिंग कॉर्पोरेशन ऑफ पाकिस्तान’ आणि ‘स्टेट ट्रेडिंग ऑर्गनायजेशन ऑफ मालदीव’ मध्ये महत्वपूर्ण आर्थिक करार झाले आहेत.

बारीक लक्ष हवं

जागतिक राजकारणात हिंद महासागर क्षेत्रात स्पर्धा वाढत असताना मालदीवचे राष्ट्रपती पाकिस्तान दौऱ्यावर आहेत. भारत या क्षेत्रातला एक शक्तीशाली देश आहे. मालदीवने अनेकदा सांगितलय काहीही झालं तरी आम्ही आमच्या भूमीचा भारतविरोधी कारवायांसाठी वापर करु देणार नाही. तरीही दोन्ही देशांमधील या करारांवर बारीक लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे, असं भारतीय एक्सपर्टच म्हणणं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us