पाकिस्तानला पुन्हा युद्धाची खुमखुमी? सौदी, तुर्की आणि चीनच्या साथीने… मुनीरचा मास्टरप्लॅन, भारताला मोठा धोका?

India -Pakistan : सौदीचा पैसा, तुर्कीची टेक्नॉलॉजी, चीनच्या मदतीने रणनीती आखत पाकिस्तान भारताविरोधात मोठी युद्ध रणनीती आखत असल्याचे समोर आले आहे. मदतीसाठी भीक मागत फिरणार्‍या पाकिस्तानला काही देश मदत करत असल्याचे समोर येत आहे.

पाकिस्तानला पुन्हा युद्धाची खुमखुमी? सौदी, तुर्की आणि चीनच्या साथीने... मुनीरचा मास्टरप्लॅन, भारताला मोठा धोका?
पाकिस्तान असीम मुनीर, पंतप्रधान नरेंद्र मोदी
Image Credit source: एजन्सी
| Updated on: Aug 30, 2026 | 8:37 AM

पाकिस्तानचा लष्कर प्रमुख आणि फील्ड मार्शल असीम मुनीर हे अचानक पाकिस्तानच्या दारुगोळा कारखान्यात पोहचले. POF या दारुगोळा कारखान्यात त्यांनी शस्त्रास्त्र आणि दारुगोळ्याची सध्यस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी दोन नवीन प्रकल्पाची पाहणी केली. या वर्षाच्या अखेरीस हे प्रकल्प सुरु होण्याची शक्यता आहे. हा केवळ एक पाहणी दौरा नव्हता. तर पाकिस्तानची बदलेली रणनीती यातून दिसून आली. कारण पाकिस्तान सौदी अरबच्या पैशांच्या मदतीने, तुर्कीच्या टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने आणि चीनच्या मदतीने भारताविरोधात मोठी युद्ध रणनीती आखत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

पाकिस्तानमध्येच दारुगोळ्यासह शस्त्रास्त्र निर्मिती

पाकिस्तानने दारुगोळा आणि शस्त्रास्त्र धोरणात एक मोठा बदल केला आहे. त्यानुसार, पाकिस्तान आता शस्त्रास्त्रांसाठी इतर देशांवर अवलंबून राहणार नाही. जगातील प्रगत शस्त्र पाकिस्तानमध्येच तयार करण्याची तयारी सुरू झाली आहे. परदेशी दारुगोळ्यावरील अवलंबित्व कमी करण्यात येणार आहे. पाकिस्तानची मिल्ट्री मीडिया विंग ISPR ने याविषयी एक माहित दिली आहे. त्यात नवतंत्रज्ञानावर भर दिला आहे. त्यासाठी नवीन शस्त्रास्त्र आणि दारुगोळा तयार करण्यात येत आहे.

याशिवाय POF यांनी खासगी कंपन्यांशी करार केला आहे. पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने त्यासाठी गुंतवणूकदार, कंपन्या आणि विद्यापीठांना सोबत घेत एक मोठी योजना आखली आहे. त्यानुसार, पाकिस्तान आता काही देशांना शस्त्रास्त्र निर्यात करणार आहे. पाकिस्तानला यासाठी सौदी अरब, तुर्की आणि चीनची मदत होणार असल्याचेही समोर येत आहे. ऑगस्ट महिन्यात सौदी अरब, तुर्कीसोबत पाकिस्तानने संयुक्त संरक्षण करार केला आहे. या करारानुसार जर यापैकी एका देशावर जरी हल्ला झाला तर तो तीनही देशांवरील हल्ला मानल्या जाईल.

चीन गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानचा संरक्षण भागीदार आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान आणि त्यापूर्वी दहशतवाद्यांकडे चीनी बनावटीची शस्त्रास्त्रे सापडली होती. तर चीनने पाकिस्तानला या संघर्षावेळी मोठी मदत केल्याची माहितीही समोर आली होती. भारताविरोधात चीन पाकिस्तानला मदत करत असल्याची बाबी लपलेली नाही. या सर्व घडामोडींकडे भारताचे बारकाईने लक्ष आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने पाकिस्तानला चांगलाच हिसका दाखवल्याने आता त्यांनी संरक्षण रणनीती बदलवली आहे. आता भारताने मोठे पाऊल टाकण्याची गरज व्यक्त होत आहे.

Follow Us