
पाकिस्तान या देशावर अन्य देशांचे, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँकेचं मोठं कर्ज आहे. विशेष म्हणजे पाकिस्तान दिवसेंदिवस या कर्जाच्या ओझ्याखाली दबतो आहे. कितीही प्रयत्न केला तरी या देशाली कर्जातून बाहेर पडता येत नाहीये. उलट आरोग्य, शिक्षण, सुरक्षा या कारणांसाठी पाकिस्तानला दिवसेंदिवस आणखी कर्ज काढावे लागत आहे. दरम्यान, आर्थिक आघाडीवर मोठ्या अडचणीत सापडलेल्या पाकिस्तानचं आता नशिब पालटलं आहे. पाकिस्तानला मोठा खजिना सापडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानला तरबेला येथे सोन्याचे मोठे भांडार सापडले आहे. तरबेला येथे सापडलेल्या सोन्याची किंमत तब्बल 636 अब्ज डॉलर्स आहे. या शोधाची माहिती एअर कराची या नव्याने आलेल्या एअरलाईन्सचे अध्यक्ष तसेच फेडरेशन ऑफ पाकिस्तान चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे माजी वरिष्ठ उपाध्यक्ष हनिफ गोहर यांनी दिली आहे. सोमवारी (3 नोव्हेंबर) प्रेस क्लबमधील चर्चेदरम्यान त्यांनी या शोधाबद्दल सांगितले आहे.
हनिफ गोहर यांनी दिलेल्या माहितीनुसार आता पाकिस्तावरील कर्जाची परतफेड होऊ शकेल एवढा सोन्याचा साठा तरबेला येथे सापडला आहे. या सोन्याच्या साठ्याच्या मदतीने विदेशी कर्जाची परतफेड करता येणार आहे. याबाबत स्पेशल न्व्हेस्टमेंट फॅसिलिटेशन काऊन्सिल (SIFC) आणि स्टेट बँक ऑफ पाकिस्तानचे (SBP) गव्हर्नर यांच्या निदर्शनास ही बाब आणून देण्यात आल आहे. सोबतच हे सोने मिळवण्यास खोदकाम केले जाणार आहे. या खोदकामाची जबाबदारी सोपवण्यासाठी ऑस्ट्रेलिया आणि कॅनडाच्या ड्रिलिंग कंपन्यांशी संपर्क साधण्यात आला आहे. पंतप्रधानांनी आदेश देताच जमिनीती सोने काढण्याची प्रक्रिया चालू केली जाईल. तशी माहिती गोहर यांनी दिली आहे.
गोहर यांनी दिलेल्या माहितीनुसार सोन्याच्या या या साठ्याबद्दल पंतप्रधान शाहबाज शरीफ तसेच सैन्यप्रमुख असीम मुनीर यांना कल्पना देण्यात आलेली आहे. अधिकृतपणे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवलेली आहे. या दोन्ही महत्त्वाच्या व्यक्तींनी या सोन्याच्या साठ्याबाबत सकारात्मकता दाखवलेली आहे. या सोन्याचा शोध घेण्यासाठी तेथील मातीचे काही नमुने घेण्यात आले. तसेच प्रयोगशाळेत त्यावर अभ्यास करण्यात आला. याच अभ्यासानुसार तरबेला या ठिकाणी तब्बल 636 अब्ज डॉलर्स किमतीचा सोन्याचा साठा आहे.
दरम्यान, आता पाकिस्तानच्या भूमित सापडलेल्या या सोन्याच्या साठ्याला बाहेर कसे काढले जाणार? तसेच खरंच या सोन्याचा वापर पाकिस्तानवरील कर्जाची परतफेड करण्यासाठी केला जाणार, हे आगामी काळात समजणार आहे.