
अमेरिका आणि इस्त्रायलने इराणवर मोठा हल्ला केला. तीन देशांमध्ये मोठे युद्ध पेटले आहे. मात्र, या युद्धाचा परिणाम फक्त या तीन देशांपुरता मर्यादित राहिला नाही तर या युद्धाचा फटका जगातील सर्वच देशांना बसत आहे. कच्चे तेल आयात होणे जवळपास देशांमध्ये सध्याच्या स्थितीला बंद झाले. भविष्यात तेलाची मोठी कमी जाणू शकते. शिवाय दुबई विमानतळाची सेवा विस्कळीत झाली. इराणने दुबईच्या विमानतळाला टार्गेट केले. मोठे हल्ले केले जात आहेत. इराणकडून ज्या देशांमध्ये अमेरिकेचे लष्कर तळ आहेत, तिथे मोठे हल्ले केले जात आहेत. यासोबतच इस्त्रायलमध्येही मोठे धमाके सतत होत आहेत, लोक बंकरमध्ये लपून बसले. या युद्धात जर सर्वात जास्त नुकसान कोणाचे झाले असेल तर ते नक्कीच इराण आहे. इराणच्या प्रमुख शहरांवर मोठे हल्ले केले जात आहेत. यासोबतच सरकारी इमारती टार्गेटवर आहेत. हे युद्ध चार ते पाच आठवडे राहण्याची शक्यता आहे. यासोबतच इराणकडून महत्वाचा सागरी मार्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने सर्वच देशांची कोंडी झाली.
इराणच्या मुख्य कमांडर सेंटरवर मोठा मिसाईल हल्ला करण्यात आला. आयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्युचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, असे इराणकडून वारंवार सांगितले जात आहे. आयातुल्ला अली खामेनेई यांना अमेरिकेने ठार केले. आयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्युनंतर जगातील अनेक देशांमध्ये लोक थेट रस्त्यावर आले आणि अमेरिकेचा आणि इस्त्रायलचा निषेध केला.
पाकिस्तानातील प्रमुख शहरांमध्ये असलेल्या पाकिस्तान दूतावास कार्यालयाला टार्गेट करत जाळपोळ आणि तोडफोड करण्यात आली. यानंतर अमेरिकेने थेट मोठा निर्णय घेत पाकिस्तानातील व्हिसा सर्व्हिस बंद करण्याचा निर्णय घेतला. यादरम्यानच आता पाकिस्तानला मोठा दणका अमेरिकेकडून दिला जात आहे.
अमेरिकेच्या दूतावासावर होणाऱ्या हल्ल्यादरम्यान पाकिस्तानातील पोलिसांनी गोळीबार केला, ज्यामध्ये 26 जणांचा मृत्यु झाला. शहबाज शरीफ आणि जनरल असीम मुनीर यांच्यावर प्रचंड दबाव आहे. यासोबतच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी बोर्ड ऑफ पीसमधून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तानवर दबाव आणला आहे. पाकिस्तान आणि अमेरिकेतील तणाव वाढला आहे.