पाकिस्तान हादरलं… 20 विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू; सर्वजण 13 वर्षाचे

पेशावरमधील एका खाजगी शाळेचे छत कोसळून भीषण दुर्घटना घडली. यात 20 विद्यार्थी आणि 1 शिक्षिकेसह 21 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. बहुतांश मृत विद्यार्थी 13 वर्षांचे होते. निकृष्ट बांधकाम आणि सुरक्षा नियमांची ऐंशिंतैशी यामुळे पाकिस्तानात अशा घटना वारंवार घडत आहेत, ज्यामुळे पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

पाकिस्तान हादरलं... 20 विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू; सर्वजण 13 वर्षाचे
Pakistan School Tragedy
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 15, 2026 | 12:44 PM

पाकिस्तानच्या एका खासगी शाळेत मोठी दुर्घटना घडली आहे. आज पेशावरच्या दिर कॉलोनीत एका खासगी शाळेचं छत कोसळल्याने कमीत कमी 21 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. यात 20 विद्यार्थी आणि एका शिक्षिकेचा समावेश आहे. पाकिस्तानचे वृत्तपत्र डॉनच्या रिपोर्टनुसार, लेडी रीडिंग रुग्णालयाचे प्रवक्ते मुहम्मद आसिम यांनी 21 जण दगावल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तसेच रुग्णालयात एमर्जन्सी जाहीर करण्यात आली आहे. या घटनेमुळे पाकिस्तान हादरून गेला आहे.

या आधी रुग्णालयाचे प्रवक्ते आसिम यांनी 17 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं होतं. पण नंतर हा आकडा वाढला. मृतांमध्ये एका शिक्षिकेचाही समावेश आहे. सर्व मृत विद्यार्थी 13 वयोगटातील आहेत. काही विद्यार्थ्यांचं वय त्यापेक्षा कमी आहे. जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करून घेतलं असून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू आहेत, अशी माहितीही आसिम यांनी दिली आहे. दरम्यान, या घटनेनंतर रुग्णालयात मुलांच्या आईवडिलांनी एकच आक्रोश केला आहे.

Loading...

पहिलीच घटना नाही

रिपोर्टनुसार, पाकिस्तानमध्ये छत किंवा इमारत कोसळणे ही सामान्य बाब आहे. सुरक्षेची ऐसीतैसी आणि बांधकामांसाठी वापरण्यात येणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या सामानामुळे पाकिस्तानमध्ये अशा दुर्घटना होत असतात. यापूर्वी जुलै महिन्यात उमरकोट येथे एका सरकारी प्रायमरी शाळेची भिंत कोसळली होती. या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दबून त्यावेळी 3 ते 13 वर्षाच्या तीन मुलींचा मृत्यू झाला होता. त्याच महिन्यात लाहौरच्या बागबानपुरा परिसरात एका खासगी शाळेत निर्माणाधीन इमारतीचं छत कोसळलं होतं. त्यात एका मुलाचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेत कमीत कमी पाच जण जखमी झाले होते.

डॉनने दिलेल्या रिपोर्टनुसार, त्यापूर्वी जूनमध्ये लाहौरच्या काहना परिसरात एका खासगी ट्यूशन सेंटरचं छत कोसळलं होतं. त्यात 14 मुलांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर डेरा गाजी खानच्या एका खासगी शाळेतील क्लासरुमचं छत कोसळलं होतं. यात चार मुलांचा मृत्यू झाला होता. तर 20 जण जखमी झाले होते. या घटनेची चौकशी करण्यात आली होती. त्यात या ट्युशन सेंटरच्या इमारतीचा विस्तार करण्यात येत असताना क्लासरुमची छत कोसळल्याचं उघड झालं होतं. मात्र, या दुर्घटनांमंधून पाकिस्तानने कोणताही धडा घेतला नसल्याचं समोर आलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us