‘इस्लामाबादचे मारेकरी’च्या घोषणा, अमेरिकेत पाकिस्तानचे फिल्ड मार्शल असीम मुनीर यांची फजिती

Asim Munir: जनरल मुनीर यांच्या काळात पाकिस्तान एक सैन्य राज्य झाले आहे. जनतेचा आवाज सैन्याकडून दाबला जात आहे. इम्रान खान यांना अनेक महिन्यांपासून कारागृहात ठेवल्यामुळे आंदोलक नाराज आहेत.

इस्लामाबादचे मारेकरीच्या घोषणा, अमेरिकेत पाकिस्तानचे फिल्ड मार्शल असीम मुनीर यांची फजिती
asim munir
| Updated on: Jun 17, 2025 | 2:30 PM

पाकिस्तानचे फिल्ड मार्शल असीम मुनीर अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांना अमेरिकेतील पाकिस्तानी लोकांच्या नाराजीचा फटका बसला आहे. मुनीर जेथे जेथे जात आहे, त्या ठिकाणी अमेरिकन पाकिस्तानी त्यांच्या विरोधात घोषणा देत आहे. वॉशिंग्टनच्या रस्त्यांवर डझनभर अमेरिकन पाकिस्तानी लोकांनी त्याच्याविरुद्ध निदर्शने केली. या आंदोलकांनी त्यांना “इस्लामाबादचा मारेकरी” आणि “पाकिस्तानचा मारेकरी” असे म्हणत त्यांच्याविरोधात जोरदार घोषणा दिल्या.

हुकुमशाही नाही तर लोकशाही हवी…

जनरल असीम मुनीर पाकिस्तान दौऱ्यावर का गेले आहेत? त्याची माहिती पाकिस्तानकडून देण्यात आली नाही. परंतु त्यांचा ताफा वॉशिंग्टनमध्ये पोहचल्यावर ते थांबलेल्या हॉटेलच्या बाहेर आंदोलक एकत्र आले. या पाकिस्तानी नागरिकांनी त्यांच्या विरोधात घोषणा दिल्या. वॉशिंग्टनमधील नाराज पाकिस्तानी लोकांनी मुनीर यांना इस्लामाबादचे मारेकरी आणि पाकिस्तानचे मारेकरी म्हटले. काही लोकांनी आम्हाला हुकुमशाही नाही तर लोकशाही हवी, अशा घोषणा दिल्या.

आंदोलकांनी आरोप केला की, जनरल मुनीर यांच्या काळात पाकिस्तान एक सैन्य राज्य झाले आहे. जनतेचा आवाज सैन्याकडून दाबला जात आहे. इम्रान खान यांना अनेक महिन्यांपासून कारागृहात ठेवल्यामुळे आंदोलक नाराज आहेत.

अमेरिकेने बोलवले नाही तर…

अमेरिकेने असीम मुनीर यांना लष्करी दिवसाच्या परेडमध्ये बोलवल्याचा बातम्या येत आहे. परंतु व्हाइट व्हाऊसने या बातम्यांचे खंडन केले आहे. व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्यांना या बातम्या खोट्या असल्याचे म्हटले आहे. अमेरिका आपल्या लष्करी परेडमध्ये विदेशातील कोणत्याही लष्करी अधिकाऱ्यास बोलवत नाही, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, असीम मुनीर यांना ट्रम्प प्रशासनाने बोलवले नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. अमेरिकेत असणाऱ्या पाकिस्तानी लोकांना भेटण्यासाठी मुनीर गेले आहेत.

इम्रान खान कारागृहात असल्याने नाराजी

असीम मुनीर यांच्यावर आरोप आहे की, इम्रान खान यांना खोट्या आरोपात त्यांनी कारागृहात ठेवले आहे. इम्रान खान यांचा पक्षाच्या कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई केली गेली आहे. इम्रान खान यांच्या समर्थकांनाही कारागृहात ठेवले आहे. मानवाधिकार संघटनेने दावा केला आहे की, सन 2023-2025 दरम्यान पाकिस्तानमधील 3000 पेक्षा जास्त राजकीय बेपत्ता झाले आहेत.