डोनाल्ड ट्रम्प यांची बायको मेलानिया की लेक इव्हांका, कोण गडगंज श्रीमंत? दोघांच्या संपत्तीचा आकडा थक्क करणारा
डोनाल्ड ट्रम्प यांची बायको मेलानिया श्रीमंत की, लेक इव्हांका? दोघींपैकी कोणाकडे आहे पाण्यासारखा पैसा, जाणून तुम्हीही व्हाल हैराण...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जगातील अशा काही निवडक नेत्यांपैकी एक आहेत, जे या पदापर्यंत पोहोचण्यापूर्वीच अधिक श्रीमंत होते. सांगायचं झालं तर, डोनाल्ड ट्रम्प यांच्या संपत्ती आकडा देखील फार मोठा आहे. केवळ रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि आखाती देशांच्या नेत्यांची संपत्ती त्यांच्यापेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे. यामुळे अनेकदा ट्रम्प यांच्या पत्नी आणि अमेरिकेच्या पहिल्या महिला मेलानिया ट्रम्प आणि त्यांची मुलगी इव्हांका ट्रम्प यांची संपत्ती किती? मेलानिया आणि इव्हांका ट्रम्प दोघींपैकी कोण अधिक श्रीमंत आहे? अशा चर्चा देखील सुरु असतात.
डोनाल्ड ट्रम्प यांची पत्नी मेलानिया यांची नेटवर्थ…
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया यांच्या संपत्तीचा आकडा आता 38.6 मिलियन पाउंड्स म्हणजे, भारतीय चलनानुसार, जवळपास 380 कोटी असल्याचं सांगण्यात येत आहे. अमेरिकेच्या पहिल्या महिला हे स्थान मिळवण्यापूर्वीच त्यांचे अनेक यशस्वी उद्योक राहिले आहेत. मेलानिया यांनी 1998 मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत लग्न केलं. तेव्हा त्या एक लोकप्रिय मॉडेल होत्या. मेलानिया यांनी व्होग, व्हॅनिटी फेअर आणि न्यूयॉर्क मॅगझिनसाठी मॉडेलिंग करून स्वतःची ओळख निर्माण केली.
मॉडेलिंग करियरसोबतच, मेलानिया यांनी स्वतःचे व्यवसायही सुरू केले. त्यांचा दागिन्यांचा ब्रँड, ‘मेलानिया टाइमपीसेस’, एक लक्झरी ब्रँड म्हणून ओळखला जातो. एवढंच नाही तर, मेलानिया यांनी एक स्किनकेअर कलेक्शनही सुरू केलं आहे, ज्यामध्ये त्वचेची काळजी घेणारी उत्पादनं आणि वृद्धत्वविरोधी उत्पादनं विकली जातात.
डोनाल्ड ट्रम्प यांची लेक इव्हांका ट्रम्प यांची नेटर्थ
इव्हांका ट्रम्प सावत्र आई मेलानिया यांच्यापेक्षा अधिक श्रीमंत आहे. फोर्ब्सनुसार, त्यांची एकून संपत्ती 289 मिलियन पाउंड्स म्हणजे, भारतीय चलनानुसार, जवळपास तीन हजार कोटी रुपये आहे… म्हणजेच मेलानिया याच्या संपत्तीपेक्षा 10 टक्क्यांनी अधिक… सांगायचं झालं तर, इव्हांका यांनी देखील मॉडेलिंग क्षेत्रातून करियरची सुरुवात केली. पण त्यानंतर उद्योग क्षेत्राकडे वळाल्या…
इव्हांका यांनी वडील ट्रम्प यांच्या व्यवसायात आणि कंपनीत कार्यकारी उपाध्यक्ष म्हणून काम पाहिलं आहे. असं म्हटलं जातं की, या काळात तिने 27 मिलियन पाउंड म्हणजे अंदाजे 265 कोटी रुपये कमावले. एवढंच नाही तर, इव्हांका ट्रम्प हॉटेल्समधील इंटिरियर डिझाइनचं काम देखील पाहतात.